Air pollution in Pune | हवा प्रदूषण नियंत्रणासाठी 4 अधिकाऱ्यांचे पथक | सहाय्यक महापालिका आयुक्त यांचे राहणार नियंत्रण
Air Pollution in Pune | पुणे शहराच्या (Pune city air pollution) हवेची गुणवत्ता खराब होत चालली आहे. देशातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून पुणे गणले जात आहे. याची गंभीरता लक्षात घेत पुणे महापालिकेने (PMC Pune) देखील गंभीरपणे पाऊल उचलले आहे. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने 4 अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात येणार आहे. यावर सहाय्यक महापालिका आयुक्त यांचे नियंत्रण राहणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आदेशांनुसार शहरामध्ये हवा प्रदूषण कमी करणे बाबत उपाययोजना व निर्देशपारित केले आहेत. तसेच उच्च न्यायालयामध्ये मुंबई व महाराष्ट्रातील इतर शहरामधील हवा निर्देशांक खराब होत असल्यामुळे उच्च न्यायालय, मुंबई यांनी SUO MOTO PUBLIC INTEREST LITGATION पारित केलेला आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत.
१. बांधकाम विकास विभाग व मनपामधील सर्व अभियांत्रिकी विभाग, पुणे महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी पारीत केलेल्या परिपत्रका/आदेशानुसार मनपा हद्दीतील चालू असलेले बांधकामांबायत संबंधित विकसक तसेच मनपाचे ठेकेदारामार्फत मनपाव्दारे करणेत येणाऱ्या देखभाल दुरुस्ती व विकास कामांच्या ठिकाणी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बाबत आदेश देण्यात यावेत. तसेच नव्याने बांधकाम परवानगी अथवा विकास कामांचा कार्यारंभ आदेश देताना आदेशामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दि. ०२/११/२०२३ रोजी पारित केलेल्या मार्गदर्शक आदेशांचा बाबत अटींमध्ये स्पष्ट उल्लेख करणेत यावा. तसेच सदर अटींची पूर्तता होत असल्याबाबत दक्षता घ्यावी.
२. पर्यावरण अभियांत्रिकी विभाग पर्यावरण विभाग यांनी हवा प्रदूषण नियंत्रण या उपक्रमामाकरिता मुख्य समन्वय अधिकारी म्हणून कामकाज करुन दैनंदिन अहवाल मा. अति. महापालिका आयुक्त (ज) यांचेकडे सादर करणेत यावा. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दि. ०२/११/२०२३ रोजी पारित केलेल्या अनुक्रमांक १८, १९, २० बायतची प्रभावीपणे अंमल असल्याची खातरजमा करणेत यावी. तसेच मुद्दा क्र. १८,१९,२० बाबतची कार्यवाही पोलीस विभाग व परिवहन विभाग [RTO] यांचेशी समन्वय साधून करणेत यावी.
३. सर्व सहाय्यक महापालिका आयुक्त सर्व सहाय्यक महापालिका आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली हवा प्रदूषण नियंत्रण करणेकामी हवा प्रदूषण नियंत्रण पथक स्थापन करणे. सदर पथकामध्ये
(१) उप अभियंता (स्थापत्य),
(२) आरोग्य निरीक्षक,
(३) कनिष्ठ अभियंता / बीट निरीक्षक
(४) एम.एस.एफ. जवान यांची नेमणूक करणेत यावी.
(१) उप अभियंता (स्थापत्य),
(२) आरोग्य निरीक्षक,
(३) कनिष्ठ अभियंता / बीट निरीक्षक
(४) एम.एस.एफ. जवान यांची नेमणूक करणेत यावी.
सदर पथकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ०२/११/२०२३ रोजी पारित केलेल्या मार्गदर्शक आदेशांमधील अनुक्रमांक १ ते १२, १७, अनुक्रमांक २१ ते २९ नुसार कामकाज करावे, तसेच उपरोक्तमध्ये नमुद केलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्याचे निर्देशनास आल्यावर नियमानुसार कारवाई करून संबंधित विभागास कळविण्यात यावे. दैनंदिनी केलेल्या कारवाईचा अहवाल गुगल शीटवर अद्ययावत करावा. जेणेकरून दैनंदिन अहवाल एकत्रित करून मा. अति. महापालिका आयुक्त (ज) यांचेकडे सादर करणे सोयीस्कर होईल.
४. शिक्षण विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग व माहिती व तंत्रज्ञान विभाग पुणे महानगरपालिकेमार्फत उपरोक्त प्रमाणे पारीत केलेल्या हवा प्रदूषण कमी करणे बाबत मनपा कार्यक्षेत्रातील रहीवाशी / नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरिता व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. तसेच मनपा शाळांमध्ये यायावतचे अभिनव उपक्रम राबवावेत. तसेच जन संपर्क विभागाने
व पर्यावरण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाशी संपर्क साधून हया प्रदुषणाशी संबंधित माहिती पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळा वर प्रसिद्धी देणे बाबतची कार्यवाही करावी.
व पर्यावरण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाशी संपर्क साधून हया प्रदुषणाशी संबंधित माहिती पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळा वर प्रसिद्धी देणे बाबतची कार्यवाही करावी.