Mumbai Pune Traffic | उद्या मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद

HomeपुणेBreaking News

Mumbai Pune Traffic | उद्या मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद

कारभारी वृत्तसेवा Nov 20, 2023 12:35 PM

Mahavikas Aaghadi | पुणेकरांना मिळकतकरात 40 टक्के सवलत कायम ठेवावी आणि शास्ती कर रद्द करावा | विधी मंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन
Pune Water cut on Thursday | पुणे शहरात उद्या (गुरुवारी) या भागात पाणीपुरवठा राहणार बंद 
Bibwewadi Hill Top Hill Slope | बिबवेवाडीतील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती | शहरातून विरोध झाल्यानंतर राज्य सरकारचा निर्णय 

Mumbai Pune Traffic | उद्या मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद

| मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

 

Mumbai Pune Traffic | यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम (Highway Traffic Management System) अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी ३५/५०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत या लांबीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने द्रुतगती मार्गाच्या कि.मी ०८/२०० येथील शेडूंग फाटा येथून वळवून रा.म.मा. क्र. ४८ जुना मुंबई पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट कि.मी. ४२/१०० येथून पुन्हा द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येईल. तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.