PMC Sanitary Napkin Tender | शिक्षण विभागाच्या सॅनिटरी नॅपकिन खरेदी टेंडरमध्ये संगनमत केल्याचा आरोप | टेंडर रद्द करून फेरनिविदा करण्याची मागणी

HomeBreaking Newsपुणे

PMC Sanitary Napkin Tender | शिक्षण विभागाच्या सॅनिटरी नॅपकिन खरेदी टेंडरमध्ये संगनमत केल्याचा आरोप | टेंडर रद्द करून फेरनिविदा करण्याची मागणी

कारभारी वृत्तसेवा Nov 03, 2023 12:42 PM

Pune : BJP Vs Prashant Jagtap : राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणाले, भाजप पुणेकरांच्या आरोग्याशी खेळत आहे
Narendra patil : नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजाची माफी मागा आणि पुन्हा आरक्षण मिळवून द्या
Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार! | चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

PMC Sanitary Napkin Tender | शिक्षण विभागाच्या सॅनिटरी नॅपकिन खरेदी टेंडरमध्ये संगनमत केल्याचा आरोप | टेंडर रद्द करून फेरनिविदा करण्याची मागणी

| भाजपच्या चेतन चावीर यांनी महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना पत्र देत केली मागणी

PMC Sanitary Napkin Tender |  पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) शिक्षण विभागाकडील प्राथमिक व माध्यमिक शाळातील (PMC Primary and Secondary School) मुलींना सॅनिटरी नॅपकीन खरेदी करणे याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र ही निविदा संगनमत करून भरली असल्याचा आरोप भाजप नेते चेतन चावीर (BJP Leader Chetan Chavir) यांनी केला आहे. मध्यवर्ती भांडार विभागाच्या (PMC Central Store Department) उपायुक्तांनी अपात्र निविदाधारकाला पात्र केले व पात्र निविदाधारकेला अपात्र केले असल्याचा आरोप करत या निविदेची तात्काळ चौकशी करण्याची मागणी चावीर यांनी केली आहे. तसेच या निविदा मध्ये पुणे महापालिकेचे 24 लाख रुपयाचे नुकसान होणार असून ही निविदा तात्काळ रद्द करून फेर निविदा मागवावी. अशा मागणीचे पत्र चावीर यांनी महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना दिले आहे. (PMC Pune News)

पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडील प्राथमिक व माध्यमिक शाळातील मुलीना सॅनिटरी नॅपकीन खरेदी करणे या कामी मध्यवर्ती भांडर कार्यालय मार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. निविदेचे ब पाकीट दिनांक ०१ नोव्हेंबर रोजी उघडण्यात आले आहे. या निविदेमध्ये मे. स्टेझी हायजीन प्रा लि. यांची सर्व कागदपत्रे असताना देखील त्यांची निवीदा अपात्र करण्यात आली आहे. तसेच शासन निणर्य मध्ये किरकोळ कारणासाठी निविदा
अपात्र करण्यात येऊ नये. असे आदेश असताना देखील उपायुक्त डॉ. चेतना केरुरे यांनी आर्थिक हितासाठी मनमानी कारभार केलेला आहे. असा आरोप पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे. चावीर यांनी पुढे म्हटले आहे कि, निविदेमध्ये Menstrual Health Management Training Certificate हि अट मध्यवर्ती भांडार कार्यालय मार्फत गेल्या २-३ वर्षात कधीही टाकण्यात आलेली नव्हती.  अट मध्ये पुणे मनपा अंतर्गत शाळामध्ये Menstrual Health Management Training Certificate देणे बंधनकारक आहे. अशी अट टाकण्यात आलेली आहे. या अटी निविदेमध्ये टाकण्यापूर्वी कार्यालयीन परीपत्रकानुसार खरेदी उच्चधिकार समिती ची मान्यता अपेक्षित असताना उपायुक्तांनी समितीची मान्यता न घेता महापालिका आयुक्त यांची आदेशाचे पालन न करता आर्थिक हितासाठी ही अट टाकली आहे. हे  प्रशिक्षण शासकीय/ निमशासकिय संस्था पैकी कुणालाही दिल्याचे चालत असताना उपायुक्तांनी  फक्त पुणे मनपा अंतर्गत शाळामध्ये असे नमूद केले आहे.  ही बाब ठराविक ठेकेदारला डोळ्यासमोर ठेऊन टाकण्यात आलेली आहे असे स्पष्ट होत आहे. (Pune Municipal Corporation) 

चावीर यांनी पुढे म्हटले आहे कि  निविदेमध्ये मे. स्टेझी हायजीन प्रा लि. पात्र असताना देखील त्यांना अपात्र करण्यात आले आहे. मे. स्टेझी हायजीन प्रा लि. यांचा  दर 24% ने कमी आहे. यात पालिकेचा फायदा होता. तर  KENDRIYA BHANDAR चा. 0.015% ( ॲट पार) होता. तर KOLEX INDUSTRIES चा 0.010% ( ॲट पार ) होता. या  निविदेमध्ये पुणे महानगरपालिकेचे किमान 24 लाख रुपयाचे नुकसान होणार आहे. (PMC Pune News)
चावीर यांनी म्हटले आहे कि, मे. स्टेझी हायजीन प्रा लि संस्था ही सॅनिटरी नॅपकीनचे उत्पादक असून त्यांचे सॅनिटरी नॅपकीन हे IS 5405: 2019 नॉर्म्स नुसार असून त्यांना शासन कडून त्याचे लायसन्स नबर सुद्धा
प्राप्त आहे. त्यांनी सादर केलेले नमुने हे IS 5405:2019 स्पेसिफिकेशनुसार आहेत व त्याच दर्जा चांगला आहे. 
 M/s KENDRIYA BHANDAR व M/S KOLEX INDUSTRIES यांनी निविदा भरली त्याचा दिनांक व वेळ  ह्यात केवळ काही फरक असल्याने ही निविदा संगनमत करून भरली असल्याचे स्पष्ट सिद्ध होते. या निविदा धारकाचे IP address देखील एकच आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारी ही निविदा रद्द करून फेरनिविदा मागवावी. अशी मागणी चावीर यांनी केली आहे.
दरम्यान याबाबत The Karbhari च्या प्रतिनिधींनी प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.