PMC Property tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागाला वसुलीसाठी अतिरिक्त 30 कर्मचारी!
| 31 मार्च पर्यंत राहणार नेमणूक
PMC Property Tax Department | पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाला (Pune Municipal Corporation Property tax Department) टॅक्स वसूलीसाठी अतिरिक्त 30 कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही 31 मार्च पर्यंत असणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Pune Property Tax)
महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1500 कोटी पर्यंत उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच व्यावसायिक मिळकत धारक देखील टॅक्स भरत नाहीत. (PMC Pune Property tax Department)
विभाग प्रमुखानी खात्याला जास्तीत जास्त वसूली करण्याबाबत आदेश दिले आहेत. विभागीय निरीक्षक (DI) आणि पेठ निरीक्षक (SI) यांना यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे करताना टॅक्स विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. नागरिक टॅक्स करण्याबाबत उदासीन दिसताहेत. तसेच काही ठिकाणी कोर्ट केसेस असल्याने अडचणी येत आहेत. तरीही दररोज 15-17 मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच विभागप्रमुखानी बिल्डर करून भोगवटा पत्र लवकरात लवकर भरून घेण्याचे आदेश दिले आहेत.
विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी
दरम्यान वसुली करण्यासाठी विभागाला मागील वर्षाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वसुलीत अडचणी येत आहेत. कारण एखादी मिळकत सील करताना किमान 5 कर्मचारी लागतात. मात्र कर्मचारी अपुरे आहेत. तसेच कधी कधी नागरिक देखील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येतात. जवळपास 100- 150 कर्मचारी कमी असल्याने विभागाकडून सामान्य प्रशासन विभागाकडे याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सध्या तरी अतिरिक्त आयुक्तांनी वसूलीसाठी 30 अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. विविध क्षेत्रीय कार्यालय आणि 1 ते 5 परिमंडळ मधील हे कर्मचारी आहेत. मात्र यांची नियुक्ती ही 31 मार्च पर्यंतच असणार आहे.
——