PMC Employees Promotion | DPC | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध  पदांसाठी समितीची बैठक संपन्न 

HomeपुणेBreaking News

PMC Employees Promotion | DPC | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध  पदांसाठी समितीची बैठक संपन्न 

Ganesh Kumar Mule Oct 06, 2023 1:12 PM

PMC Contract Employees | पुणे महानगरपालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लाख  विम्याची रक्कम प्राप्त
PMC Employees | आयुक्त साहेब आम्हांला न्याय द्या | आमच्या समस्या तुम्ही तरी ऐकून घ्या | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची आयुक्तांना साद! 
MHADA | Stamp Duty Amenity Scheme | म्हाडाच्या इमारत पुनर्विकासातील अडथळे हटणार | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

PMC Employees Promotion | DPC | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध  पदांसाठी समितीची बैठक संपन्न

| महापालिका कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त

DPC | PMC Employees Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) प्रशासन अधिकारी (Administration Officer), अधीक्षक (Superintendent) तसेच इतर 5 पदावर पदोन्नती बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मिळणार आहे. या पदांवर पदोन्नती देण्यासाठी  पदोन्नती समितीची बैठक (DPC) आज आयोजित करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. जवळपास 80-90 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. काही दिवसांतच कर्मचाऱ्यांना नवीन पदाबाबत आदेश काढले जातील. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून (PMC General Administration Department) देण्यात आली.

पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासनाने  पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.  महापालिका कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा मिळाला आहे. अधीक्षक, प्रशासन अधिकारी सह या बैठकीत, विभागीय अतिक्रमण निरीक्षक, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर,  नेटवर्क, हार्डवेअर) या पदांसाठी पदोन्नती देण्यात आली. संगणक ऑपरेटर व संगणक प्रोग्रॅमर या पदावरून  कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर), कनिष्ठ अभियंता (नेटवर्किंग) पदावर पदोन्नती दिली गेली. तसेच विभागीय अतिक्रमण निरीक्षक पदावर देखील पदोन्नती देण्यात आली.  असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

 पदोन्नती समितीतील पदे

1.  उपअधीक्षक ते अधीक्षक

2. अधीक्षक ते प्रशासन अधिकारी

3. विभागीय अतिक्रमण निरीक्षक

4. शस्त्रक्रिया गृह सहाय्यक

5. कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर, नेटवर्क, हार्डवेअर)

—-

विविध पदांच्या पदोन्नतीसाठी आम्ही महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो. अखेर कर्मचाऱ्यांना बढती मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे समितीतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आता लवकरच पदस्थापना करून कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जावीत.

रुपेश सोनावणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना

—–