Ganesh Visarjan Holiday  | पुणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालयांना अनंत चतुर्दशीची सुट्टी जाहीर | विभागीय आयुक्त कार्यालयाचे आदेश जारी

HomeBreaking Newsपुणे

Ganesh Visarjan Holiday | पुणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालयांना अनंत चतुर्दशीची सुट्टी जाहीर | विभागीय आयुक्त कार्यालयाचे आदेश जारी

Ganesh Kumar Mule Sep 27, 2023 3:17 PM

Lad Page Committee | कंत्राटी कामगारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा 
Jumbo Covid Center : जम्बो कोविड सेंटर बाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने केला ‘हा’ खुलासा
International Yoga Day | सकारात्मक उर्जानिर्मितीसाठी योगविद्या आत्मसात करा | डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Ganesh Visarjan Holiday  | पुणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालयांना अनंत चतुर्दशीची सुट्टी जाहीर | विभागीय आयुक्त कार्यालयाचे आदेश जारी

Ganesh Visarjan Holiday  | अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) निमित्त पुणे जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना उद्या म्हणजे गुरुवारी सुट्टी (Holiday) जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या पुणे महापालिका कर्मचारी आणि इतर सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची आवश्यकता नाही. महापालिका प्रशासन देखील याबाबतचे आदेश जारी करेल. दरम्यान या निमित्ताने कर्मचाऱ्यांना सलग 5 दिवस सुट्टी मिळणार आहे.
गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) आणि ईद ए मिलादचा (Eid-a-Milad 2023) सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) देखील उद्या कामावर यावे लागणार होते. मात्र यामुळे बराच संभ्रम निर्माण होत होता. मात्र विभागीय आयुक्त कार्यालयाने हा संभ्रम दूर केला आहे.

 – असे आहेत विभागीय आयुक्त कार्यालयाचे आदेश

शासन निर्णय २७ सप्टेंबर २०२३ चे अधिसुचनेनुसार ई-ए-मिलाद ची शासकिय सुट्टी दिनांक २८ सप्टेंबर २०२३ ऐवजी शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करणेत आली आहे.  २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने पुणे येथे सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणुक काढण्यात येते. नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने प्रतिवर्षी पुणे जिल्ह्याकरीता अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात येते. तथापि  २८ सप्टेंबर रोजीची शासकीय सुट्टी रद्द होवून २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिर केल्याने शासन, राजनैतिक सेवा विभाग, निर्णय अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मी, सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे या नात्याने पुणे जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशी, दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करीत आहे.

| सलग 5 दिवस सुट्टी

दरम्यान या निमित्ताने पुणे महापालिका आणि पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना सलग 5 दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यानुसार उदा 28 सप्टेंबर ला अनंत चतुर्दशीची स्थानिक सुट्टी, 29 ची सार्वजनिक सुट्टी, शनिवार, रविवार आणि सोमवार 2 ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती निमित्त सुट्टी असणार आहे.
——