Labour Meeting | कामगार कायदे टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरणार | आमदार भाई जगताप

HomeपुणेBreaking News

Labour Meeting | कामगार कायदे टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरणार | आमदार भाई जगताप

Ganesh Kumar Mule Aug 17, 2023 1:36 PM

Sunil Shinde | RMS | आरएमएसचे अध्यक्ष सुनील शिंदे जागतिक मेळाव्याला करणार संबोधित
ESIC | अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना ESIC चे लाभ लागू करावेत
UNI Global Union | सुरक्षा रक्षकांचे जागतिक संघटन करणार | जागतिक परिषदेत उमटला सूर!

Labour Meeting | कामगार कायदे टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरणार | आमदार भाई जगताप

Labour Meeting | कामगार कायदे (Labour Law) आपला श्वास आहे तो टिकवायचं असेल तर त्यासाठी संविधान टिकल पाहिजे पण हे बदलायच काम सध्याचं केंद्र सरकार (Central Government) करत आहे. असं प्रतिपादन कामगार नेते व आमदार भाई जगताप (MLA Bhai Jagtap) यांनी केले. राष्ट्रीय मजदुर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यामध्ये (Labour Meeting) ते बोलत होते. ते पुढे म्हणाले राज्य सरकार व केंद्र सरकार हे दोघेही मालक धार्जीने निर्णय घेत आहेत या निर्णयामध्ये कामगारांना विश्वासात घेतले जात नाही ही बाब अत्यंत गंभीर असून यापुढे कामगारांनी रस्त्यावर उतरूनच लढलं पाहिजे. (Labour Meeting)
       यावेळी बोलताना माणिकराव ठाकरे म्हणाले कष्टकऱ्यांच आयुष्य घडवण्याचं काम जर पाहायचं  असेल व शून्यातून जग कसं निर्माण होत हे शिकायचं असेल तर राष्ट्रीय मजदूर संघटनेच्या लढा समजून घेतल पाहिजे असे गौरवोद्गार काढले.
संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की कायम कामगार असो की  कंत्राटी की बदली कामगार की गिग वर्कर यांच्या मनातील भिती घालवायचं, कामगारांना लढायची हिम्मत देण्याचं काम राष्ट्रीय मजदूर संघटनेच्या स्थापनेपासून  राहिल आहे. याप्रसंगी समान कामाला समान वेतन मिळालच पाहिजे, कामगार विरोधी धोरण व कायदे रद्द करा या घोषणा व आभाळाची आम्ही लेकरे, मेरा रंग दे बसंती चोला ही गाणीही घेण्यात आली. असंघटीत कामगारांची ओळख असलेल्या इ-श्रम कार्ड घरेलु कामगार महिलांना प्रातिनिधिक वाटप करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते व आमदार भाई जगताप हे उपस्थित होते. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी अध्यक्ष अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे व  विविध क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये घरेलू कामगार, बांधकाम मजूर,
पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार, कंपन्यांमधील कामगार, हॉस्पिटल संघटित व असंघटित क्षेत्रातील सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, ऑटो रिक्षा चालक, स्विगी, झोमॅटो, ओला उबेर, अर्बन कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे सेक्रेटरी एस के पळसे यांनी केले.