August Kranti Din | संकल्प सेवा फाऊंडेशन कडून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

HomeBreaking Newsपुणे

August Kranti Din | संकल्प सेवा फाऊंडेशन कडून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

Ganesh Kumar Mule Aug 11, 2023 10:13 AM

International Night Marathon | ४ डिसेंबरला रंगणार यंदाची ३६वी पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन
Bank Election | श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बॅंकेची निवडणूक बिनविरोध 
Agitation | pune congress | स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कोठेही आणि कोणाचाही सहभाग नसल्यामुळे भाजप व संघाला काँग्रेसच्या देशभक्तांच्या नावाची ॲलर्जी | ॲड. अभय छाजेड

August Kranti Din | संकल्प सेवा फाऊंडेशन कडून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

August Kranti Din | ऑगस्ट क्रांती दीना निमित्त संकल्प सेवा फौंडेशन पुणे तर्फे श्री संत ज्ञानदेव शाळा येथे अभय छाजेड ( सरचिटणीस, महा. प्रदेश काँग्रेस कमिटी ) यांच्या हस्ते  विद्दयार्थ्यांना शालेय दप्तर चे वाटप करण्यात आले.  शालेय दप्तर पाहून विद्याथ्यांनी जलौषात आनंद साजरा केला. (August Kranti Din)
 या प्रसंगी अभय छाजेड यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, ऑगस्ट क्रांती दिन म्हणजे, इंग्रजांनी भारत देश सोडावा या साठी  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ” चले जाव ” चा नारा दिला. अनेक महिला या देशाच्या स्वतंत्रसाठी लढा दिला.
१९४२  च्या ” भारत छोडो आंदोलनामुळेच कलाटणी मिळाली. या आंदोलनात शहीद झालेला शहिदांना अभिवादन करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना  भरत सुराणा म्हणाले, आपण समाजाला काही देणे लागतो या भावनेने हा शैक्षणिक कार्यक्रम राबवत आहे व पुढेही असे अनेकसमाज उपयोजि कार्यक्रम करत राहू.
संकल्प सेवा फौंडेशन चे अध्यक्ष भरत सुराणा, उपाध्यक्ष अरुण कटारिया, योगिता सुराणा,  मॉडेल दक्ष सुमेरपूर, ऍथलेटिक दिया सुमेरपूर,मुख्याध्यापिका अनुराधा पवार, विजया शेंडगे, चेतन चोरडिया, राजू चव्हाण,  लखन सनादे , मितेश सोळंकी, रमेश सोनकांबळे, रवी ननावरे, अजित इंगळे, नितीन निकम, नर्सिंग आंदोळी, दिलीप शेळवंटे,  जितेश जैन, शर्मिला जैन उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रशांत हजारे यांनी केले तर  आभार अरुण कटारिया यांनी केले.