PMC Vaccination Drive | पुणे महापालिका आगामी तीन महिने राबवणार लसीकरण मोहीम | लहान मुले आणि गरोदर मातांना लाभ

HomeBreaking Newsपुणे

PMC Vaccination Drive | पुणे महापालिका आगामी तीन महिने राबवणार लसीकरण मोहीम | लहान मुले आणि गरोदर मातांना लाभ

Ganesh Kumar Mule Aug 02, 2023 3:08 AM

Pension | PMC | शिक्षण विभागाकडील पगारपत्रक लेखनिकाची एक वेतनवाढ कायस्वरूपी रद्द! | पेन्शन प्रकरणे मार्गी न लावल्याने अतिरिक्त आयुक्तांची तीव्र नापसंती
Pune Municipal Corporation | BLO म्हणून कामकाज करण्यास 73 महापालिका कर्मचाऱ्यांची टाळाटाळ | जिल्हा प्रशासनाकडून तक्रार
Impact | सेवानिवृत्त सेवकांची प्रलंबित पेन्शन प्रकरणे लागणार मार्गी! | लेखा परीक्षण विभागाकडे उपलब्ध केली अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज | ‘द कारभारी’ च्या बातमीचा परिणाम

PMC Vaccination Drive | पुणे महापालिका आगामी तीन महिने राबवणार लसीकरण मोहीम | लहान मुले आणि गरोदर मातांना लाभ

 PMC Vaccination Drive |  केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) ऑगस्टपासून आगामी ३ महिन्यात ” मिशन इंद्रधनुष्य ५.०” लसीकरण मोहीम (Vaccination Drive) राबविण्यात येणार आहे. ह्या मोहिमेत मुख्यत्वेकरून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना त्याचप्रमाणे ज्या बालकांचे लसीकरण वयोमानानुसार आवश्यक आहे, अशा सगळ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Vaccination Drive)

 मोहिमेच्या ३ फेऱ्या पुढील प्रमाणे –
पहिली फेरी – दि. ७ ते १२ ऑगस्ट २०२३
दुसरी फेरी – दि. ११ ते १६ सप्टेंबर २०२३
तिसरी फेरी – दि. ९ ते १४ ऑक्टोबर २०२3
“गोवर-रुबेला निर्मुलन २०२३” या केंद्र शासनाच्या मुख्य श्रोग्णाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे. या मोहिमेत पहिल्यांदाच 2 ते 5 वर्षे हा वयोगट समाविष्ट करण्यात आला आहे. ६ ऑगस्ट २०१८ अथवा त्यांनंतर जन्मलेल्या सर्व बालकांचे लसीकरण या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. या मोहिमेचे पूर्ण नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले आहे. जोखीमग्रस्त भाग जसे की ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. गोवर रुग्णांचे प्रमाण अधिक असलेले भाग, लसीकरणाम नकार देणारा समाज झोपडपट्टी बांधकाम ठिकाणे, विटभट्ट्या अशाप्रकारच्या जोखीमग्रस्त भागात विशेष लसीकरण सत्रे आरोग्य विभागाकडून आयोजित करण्यात येणार आहेत. (Pune Municipal Corporation News)
या मोहिमेची तयारी करण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ३१/०७/२०२३ रोजी सिटी टास्क फोर्सची मिटिंग घेण्यात आली असून या मोहिमेत शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, सामाजिक विकास विभाग, रेल्वे व एस. टी. परिवहन मंडळ यांना सहभागी करण्याचे आदेश देण्यात आले. मोहिमेची जनजागृती करण्यासाठी शाळांमार्फत प्रभातफेरी तमेच जोखीमग्रस्त भागात पथनाट्ये करण्याचे नियोजन करण्यात आले. (PMC Pune News)

या मोहिमेत नव्याने बालकांचे लसीकरण करण्याकरिता U WIN हे ऑनलाईन पोर्टल बनविण्यात आले असून या पोर्टलद्वारे लसीकरण मंत्रांचे दिनांक वेळ ठिकाणे याची सर्व माहिती तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन नागरिकांना घरबसल्या करता येणार आहे. अशी माहिती अतिमहापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांचेकडून देण्यात आली आहे. तसेच लमीकरणासाठी पुणे महानगरपालिकेच्या जवळच्या दवाखान्यात संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार (Health Chief Dr Bhagwan Pawar) यांच्याकडून करण्यात आले आहे

” मिशन इंद्रधनुष्य ५.०” या मोहिमेत सहभागी होण्यासाठी महापालिकेकडून खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, धर्मगुरू, सामाजिक संस्था यांना आवाहन करण्यात आले आहे. आपल्या घरातील अथवा आपल्या शेजारील सर्व बालकांचे व गरोदर मातांचे पूर्ण लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी केले आहे.
——
News Title | PMC Vaccination Drive | Pune Municipal Corporation will conduct vaccination campaign for the next three months Benefits for infants and pregnant mothers