Manipur Violence | मणीपुर सरकार त्वरित बरखास्त करा | मा.आ.मोहन जोशी

HomeपुणेBreaking News

Manipur Violence | मणीपुर सरकार त्वरित बरखास्त करा | मा.आ.मोहन जोशी

Ganesh Kumar Mule Jul 21, 2023 2:37 PM

Jantar Mantar Protest |  जंतर मंतर येथे आंदोलनासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे २५० पदाधिकारी रवाना
Manipur Violence | NCP Pune | मणिपुरमध्ये महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादी काँग्रेस कडून निषेध आंदोलन
Sign Campaign | Manipur Violence | मणिपूर हिंसाचारात महिलांवर झालेल्या अत्याचाराला जबाबदार कोण?? | एक सही संतापाची मोहीमेला सर्व पक्षीयांची उपस्थिती

Manipur Violence | मणीपुर सरकार त्वरित बरखास्त करा | मा.आ.मोहन जोशी

Manipur Violence | गेले तीन महिने मणिपूर राज्यात हिंसाचाराचा (Manipur Violence) जो उद्रेक चालु आहे तसेच अनेक महिलावर अत्याचार चालु आहे. या अत्याचारा विरोधात रिजनल ख्रिश्चन सोसायटी व पुरोगामी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. (Manipur Violence)
 या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी  (Mohan Joshi) म्हणाले, गेले तीन महिने जो जातीयवादी हिंसाचाराचा चालु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विषयाचे गांभीर्य अजिबात नाही कॉंग्रेस पक्षाने अनेकदा त्यांना विनंती करुन सुध्दा ते या गोष्टींवर मुगगिळुन गप बसले आहे. राहुल गांधी यांनी मणिपूर दौरा करून तेथील जनतेच्या भावना जाणून घेण्याल्या त्यांच्या बद्दल संवेदना व्यक्त केल्या व त्यांना धीर देला.काल सोशल मीडियावर जे फोटो वायरल झाले त्यात दोन महिलांनावर जे अत्याचार करण्यात आले ते संपूर्ण जगाने पाहिले त्या मुळे आपल्या देशाची मान शर्मेने खाली गेली आहे. सुप्रीम कोर्टाने या घटनेची दखल घेतली व केंद्र सरकार वर ताशेरे ओढले. त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या बाहेर आठ मिनिटाच्या भाषणात फक्त 36 सेकंदच या विषयावर बोलले आमची एकच मागणी आहे मनिपुर सरकार बरखास्त झाले पाहिजे व राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे. (Manipur Government)
पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना संघटनेच्या वतीने निवेदना देण्यात आले.या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत केदारी, राहुल डंबाळे अश्विनीताई लांडगे,प्रविण करपे,जुबेर मेमन,सुरेश कांबळे,पाष्टर केळकर,फादर रॉबीन मानतोडे,अन्टॉन कदम,अलीस लोबो, याच बरोबर समाजतील पुरोगामी विचारांचे प्रतिनिधी उपस्थित होते..या प्रसंगी मणिपूर अत्याचार धिंकार करण्यात आला, मणिपूर वाचवा मानवता वाचवा, बरखास्त करा बरखास्त करा मणीपुर सरकार बरखास्त करा या घोषणा देण्यात आल्या. (Manipur News)
—-
News Title | Manipur Violence | Dismiss Manipur Govt Mohan Joshi