PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र 

HomeBreaking Newsपुणे

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र 

Ganesh Kumar Mule Jul 20, 2023 2:08 PM

PMC Pune Deputy commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप को कारण बताओ नोटिस जारी 
Shetkari Athvade Bajar | शेतकरी आठवडे बाजारासाठी पुणे महापालिकेकडून नियमावली!
PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | अन्यथा 5 हजार ते 25 हजारा पर्यंत द्यावे लागतील चार्जेस 

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेच्या लोगोचा (PMC Pune Logo) आणि नावाचा वापर करून बोगस ओळखपत्र (Bogus Identity card) तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ठेकेदार, त्यांचे कामगार, माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते, मानधनावर काम करणारे, लायझनिंग करणारे कर्मचारी अशा लोकांचा समावेश आहे. मागील आठवड्यपासून महापकिकेने ओळखपत्र तपासण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महापालिकेला असे 175 बोगस ओळखपत्र धारक सापडले आहेत. तूर्तास तरी सुरक्षा विभागाने (PMC Security Department) या लोकांना तंबी देऊन सोडले आहे. आगामी काळात मात्र अशा लोकांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सुरक्षा विभागाकडून देण्यात आला आहे. उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी ही माहिती दिली. (PMC Bogus Identity Card)
महापालिकेत वेगवेगळ्या कामासाठी नागरिक येत असतात. मात्र यातील काही लोक हे महापालिकेत पार्किंग करण्यासाठी, काही कारण नसताना येत असलेले आढळले आहे. यामुळे पार्किंग करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. तसेच हकनाक गर्दी दिसते. पुणे हे दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट आहे हे नुकतेच काही प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सुरक्षा विभागाने महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरु केली आहे. हे काम तृतीय पंथीयांना देण्यात आले आहे. ओळखपत्र दाखवल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. यामध्येच महापालिकेला बोगस ओळखपत्र मिळाले. महापालिकेच्या लोगोचा यासाठी वापर करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)
याबाबत मुख्य सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले कि, महापालीकेच्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र स्मार्ट कार्ड देण्यात आली आहेत. त्यावर सेवक कोड नंबर आणि आधार कोड आहे. मात्र बोगस ओळखपत्रावर असे काही आढळून आले नाही. त्यामुळे अशी 175 ओळखपत्र आम्ही जप्त केली आहेत. यामध्ये ठेकेदार, त्यांचे कामगार, माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते, मानधनावर काम करणारे कर्मचारी अशा लोकांचा समावेश आहे. विटकर यांनी सांगितले कि तूर्तास तरी या लोकांना आम्ही सक्त ताकीद दिली आहे कि असे ओळखपत्र न वापरता तुमच्या कंपनीचे किंवा ठेकेदाराचे ओळखपत्र वापरा. आगामी काळात असे प्रकार घडले तर फौजदारी कारवाई केली जाईल. (PMC Pune News)
विटकर यांनी पुढे सांगितले कि नुकतेच नेमलेले तृतीयपंथी हे काम चांगले करत आहेत. तसेच सहायक सुरक्षा भारत जाधव, सुरक्षा जमादार – राजू येनपुरे हे यात मदत करत आहेत. पालिकेत येताना ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी कामावर असताना ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. असे ही विटकर यांनी सांगितले.
——
जे लोक महापालिकेत अशा पद्धतीने बोगस ओळखपत्र वापरतात त्यांनी आपल्या कंपनीचे किंवा ठेकेदाराच्या नावाचे ओळखपत्र बनवणे आवश्यक आहे. याबाबतचे आदेश देखील अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आहेत.  आम्ही हे जप्त केलेले ओळखपत्र सामान्य प्रशासन विभागाकडे देणार आहोत.
माधव जगताप, उपायुक्त, सुरक्षा विभाग 
—–
महापालिकेत जे लोक  बोगस ID कार्ड धारण करतील त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच असे ओळखपत्र बनवून देणाऱ्या लोकांना देखील कारवाई केली जाईल. मनपा कर्मचाऱ्यांनी कामावर असताना ओळखपत्र घालणे आवश्यक आहे.
राकेश विटकर, मुख्य सुरक्षा अधिकारी 
———-
News Title | PMC Bogus Identity Card | In Pune Municipal Corporation, bogus identity card holders are in trouble Security department seized 175 fake identity cards