Women Self Defence Training | गुरुपोर्णिमेपासून साडे तीन लाख मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे!   |  राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार

HomeBreaking Newssocial

Women Self Defence Training | गुरुपोर्णिमेपासून साडे तीन लाख मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे! | राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार

Ganesh Kumar Mule Jun 23, 2023 5:09 AM

Dr Neelam Gorhe | राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन
Cabinet Meeting | आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय 
Sharad Joshi Vicharmanch Shetkari Sanghatna | यापुढे शेतकऱ्याची बाजार समितीत लूट होणार नाही | विठ्ठल पवार राजे 

Women Self Defence Training | गुरुपोर्णिमेपासून साडे तीन लाख मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे!

|  राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार | महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Women Self Defence Training | छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त (Rajyabhishek Year) राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण (Self Defence Training) देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून 3 ते 15 जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Women and child welfare Minister Mangal Prabhat Lodha) यांनी मंत्रालयातील दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव श्री. ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Women Self defence training)
मंत्री  श्री. लोढा म्हणाले, अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खुपच आवश्यक आहे.  शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापिठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी  नियोजन करण्यात आलेले आहे. स्थानिक महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, स्थानिक सामाजिक संस्था, महाविद्यालयीन एनएसएस, स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडावा.
युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी  तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत
*पहिला दिवस*
  महिला व मुलींवरील हिंसाचार-संकल्पना व सद्यस्थिती या विषयावर भारतीय स्त्री शक्ती संस्था मार्गदर्शन करेल. सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी होतील.
तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर सायबर सेल तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करतील. दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी
होतील.
*दुसरा दिवस*
*स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक*
स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत होणार असून  1 हजारयुवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
आधुनिक प्रशिक्षण या विषयावर सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
*तिसरा दिवस*
प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
प्रात्यक्षिक आणि सरावसकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
    या तीन दिवसाच्या शिबीरानंतर ज्या युवतींना अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणात रुची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढील दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागामार्फत करण्यात येईल.
– मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार
    महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावर अव्यावसायिक तत्वावर आज मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. वेळोवेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था यांचेसोबत आवश्यकतेनुसार सामजंस्य करार करण्यात येतील. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये ४० लाख बालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उस्फूर्तपणे योग दिवस साजरा केला असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.
****
News Title | Women Self Defense Training |  Three and a half lakh girls will get self defense lessons from Guru Poornima!|  Rajmata Jijau Girls Self Defense Program to start