PMC Assistant commissioner | सहायक आयुक्त यांचा प्रभारी पदभार उप अभियंत्यालाच का दिला जातो? 

HomeBreaking Newsपुणे

PMC Assistant commissioner | सहायक आयुक्त यांचा प्रभारी पदभार उप अभियंत्यालाच का दिला जातो? 

Ganesh Kumar Mule May 10, 2023 8:50 AM

Big decision of Pune Municipal Corporation! | 4% DA applicable to employees from July 1
Pashan-sus Road | पाषाण -सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा | नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना
Repaired 90% potholes | महापालिकेचा ९०% खड्डे दुरुस्त केल्याचा दावा  | शहरात मात्र खड्डेच खड्डे 

PMC Assistant commissioner | सहायक आयुक्त यांचा प्रभारी पदभार उप अभियंत्यालाच का दिला जातो?

| पुणे महापालिका लेखनिकी संवर्गातील कर्मचाऱ्यांचा सवाल

PMC Assistant commissioner | (Author- Ganesh mule) पुणे महापालिकेत (Pune municipal corporation) लेखनिकी संवर्गाबाबत (Clerical Cadres) दुजाभाव केला जात असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये वाढीस लागत आहे. याला कारणे ही तशीच आहेत. लेखनिकी संवर्गातील कर्मचाऱ्यांची क्लास वन होण्याची संधी एकीकडे हिरावून घेतली जातेय. तर दुसरीकडे त्याचा कामकाजावर शंका उपस्थित करत सहायक आयुक्त पदाचा प्रभारी पदभार देखील दिला जात नाही. तो अभियंता संवर्गातील उप अभियंता (Deputy Engineer) लाच दिला जातो. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे लेखनिकी संवर्गातील कर्मचारी नाराज असल्याची भावना व्यक्त करत आहेत. (PMC Pune assistant commissioner News)
| प्रशासन अधिकाऱ्याला प्रभारी पदभार देणे आवश्यक 
महापालिका सेवा नियमावली (PMC pune Service rules) नुसार सहायक महापालिका  आयुक्त पदासाठी अर्हता आणि नेमणुकीची पद्धत कशी करावी हे ठरवून दिले आहे. त्यानुसार त्याची साखळी देखील बनवण्यात आली होती. त्यामध्ये लेखनिकी संवर्गासाठी अधीक्षक, प्रशासन अधिकारी, सहायक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अशी आहे. तर तांत्रिक पदासाठी शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि शहर अभियंता अशी आहे. (PMC Pune news)
कधी कधी सहायक आयुक्त हे पद रिक्त होते. त्या ठिकाणी नवीन अधिकारी येईपर्यंत प्रभारी चार्ज दिला जातो. पद्धत अशी आहे कि प्रशासन अधिकाऱ्याला ही जबाबदारी द्यायला हवी. मात्र गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत तसे केले जात नाही. प्रशासन अधिकाऱ्याला हे काम झेपणार नाही, असे गृहीत धरून उप अभियंता यांना हा पदभार दिला जातो. खरे पाहता सहायक आयुक्त हा खूप जबाबदार माणूस असतो. अभियंत्यांनी केलेल्या सगळ्या कामाची बिले तोच तपासत असतो. मात्र आता उप अभियंता सहायक आयुक्त झाल्यानंतर काम करणारा देखील तोच आणि बिले तपासणारा देखील तोच अधिकारी अशी स्थिती होत आहे. त्यामुळे या कार्यपद्धतीवरच टीका होत आहे.  शिवाय प्रशासन अधिकाऱ्याला प्रभारी पदाची जबाबदारी न देता त्याच्या कामावर आधीच का संशय घेतला जातो? त्याला काम जमणार नाही, असे का गृहीत धरले जाते?   तो लायक नाही हे कशाच्या आधारावर ठरवले जाते? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
PMC Assistant Commissioner Why is the charge of Assistant Commissioner given to Deputy Engineer only? | The question of employees of Pune Municipal Secretariat cadre