PMC Pune Property Tax 40% Discount PT 3 Application Form | ४०% सवलतीचा पीटी ३ अर्ज महापालिका वेबसाईट वर उपलब्ध 

HomeपुणेBreaking News

PMC Pune Property Tax 40% Discount PT 3 Application Form | ४०% सवलतीचा पीटी ३ अर्ज महापालिका वेबसाईट वर उपलब्ध 

Ganesh Kumar Mule May 07, 2023 6:42 AM

Pandharpur Aashadhi wari | पंढरपुरकडे पायी निघालेल्या लाखो महिला वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य वारी’
Yerwada Katraj Underground Road | पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग
NCP Strike | हक्काच्या पाण्याकरिता स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे राष्ट्रवादीचे उपोषण

PMC Pune Property Tax 40% Discount PT 3 Application Form | ४०% सवलतीचा पीटी ३ अर्ज महापालिका वेबसाईट वर उपलब्ध

| क्षेत्रीय कार्यांलयांसह नागरी सुविधा केंद्र येथे अर्ज जमा करावा लागणार

PMC Pune Property Tax 40% Discount PT 3 Application Form |  पुणेकरांना मिळकत करात ४०% सवलत (property tax 40% Discount)  कायम ठेवण्याबाबत निर्णय झाला आहे. त्यानुसार  पुणे महापालिकेने (PMC Pune) ज्या नागरिकांची ४० टक्के मिळवण्यासाठी पीटी ३ हा अर्ज (PT 3 application form) महापालिकेच्या वेबसाईट (PMC Pune Website) वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर निवासी मिळकतींसाठी 40% सवलतीचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.  हा अर्ज भरून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यांलयांसह (Ward offices) नागरी सुविधा केंद्र (CFC centers) येथे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. (PMC Pune Property Tax 40% Discount Application Form)
पुणे महापालिकेतर्फे (Pune Municipal Corporation)  मिळकत दिली जाणारी ४० टक्के सवलत (Property Tax 40% Discount) काढून घेण्यात आलेली होती. २०१९ पासून त्याची वसुली केली जात होती. या विरोधात पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर ही सवलत पुन्हा एकदा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी यंदाच्या आर्थिक वर्षापासून केली जात आहे.पुणे महापालिकेच्या मिळकत विभागाने (PMC Pune Property Tax Department) त्यानुसार बिले तयार करणे व ज्या नागरिकांनी ४० टक्के सवलतीची रक्कम भरलेली आहे त्यांना ती परत करणे व ती पुन्हा लागू करणे यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. सुमारे पावणेतीन लाख नागरिकांना ही सवलत पुन्हा मिळविण्यासाठी महापालिकेकडे पीटी ३ हा अर्ज सादर करावयाचा आहे. (PMC Pune News)
पण हा अर्ज कुठे मिळतो, पुरावे काय जोडावे लागतात आणि अर्ज भरल्यानंतर तो कोठे सादर करावा याबाबत संभ्रम निर्माण झालेला होता यासंदर्भात महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेले आहे.मिळकत करून विभागाचे प्रमुख अजित देशमुख म्हणाले, “पीटी ३’ हा अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरावा, हा अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मिळकत निरीक्षकाकडे जमा करावा किंवा नागरी सुविधा केंद्रांमध्ये देखील जमा करता येईल. स्थायी समितीच्या पूर्वीच्या निर्णयानुसार हा अर्ज सादर करताना यासाठी २५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष जाऊनच हे अर्ज सादर करावे लागणार आहेतही आहे.  (Pune Municipal Corporation)