Manjri Flyover | मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुल वाहतुकीसाठी लवकर खुला करा  | सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

HomeBreaking Newsपुणे

Manjri Flyover | मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुल वाहतुकीसाठी लवकर खुला करा | सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

Ganesh Kumar Mule Apr 29, 2023 2:52 AM

Pune Municipal Corporation (PMC) – पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने बांधण्यात आलेल्या स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे लोकार्पण!
Pune : Hadapsar : पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला
Pramod Nana Bhangire | महंमदवाडी परिसरातील सोसायट्यांचा पाणी प्रश्न सुटणार! | आढावा बैठकीत प्रमोद नाना भानगिरे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना केल्या सूचना

मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुल वाहतुकीसाठी लवकर खुला करा  | सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

पुणे |  भूसंपादनाची (Land Acquisition) उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करुन मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे (Manjri new railway Flyover) राहिलेले काम पूर्ण करावे. हा पूल लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण (PWD Minister Ravindra Chavan) यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (PWD) बांधण्यात आलेल्या मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, सा. बां. पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, मांजरी गावचे सरपंच शिवराज घुले आदी उपस्थित होते.

उड्डाणपुल कामाच्या पाहणीनंतर कार्यक्रमात मंत्री श्री. चव्हाणे म्हणाले, नवीन रेल्वे पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. राहिलेल्या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया संबंधितांनी त्वरित पूर्ण करावी. या कामाबरोबरच सेवा रस्ते आणि इतर अडचणी लवकरच सोडविण्यात येतील. नवीन रेल्वे उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा उड्डाणपूल परिसरातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे काम दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशाही सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.

प्रकल्पामध्ये २५ मीटर लांबीचे १४ गाळे असा एकूण ३५० मीटर लांबीचा मुख्य पूल असून हडपसर बाजूला १४९.५.मीटर आणि मांजरी बाजूला १७४.९५५ मीटर असा एकूण ३२४.५ मीटर लांबीचा रॅम्प आहे.

यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0000