Chandrkant Patil | संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

HomeBreaking Newsपुणे

Chandrkant Patil | संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Ganesh Kumar Mule Apr 26, 2023 9:53 AM

Khadakwasla Canal Advisory Committee | आज कालवा सल्लागार समितीची बैठक | पाणीकपात होण्याची शक्यता कमी
Pune Water Cut | पुणे शहरात सध्या पाणीकपातीचा विचार नाही | कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
Canal Advisory Committee meeting | कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा

संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

पुणे | यंदाच्या पावसाच्या अंदाज पाहता धरणातील पाणीबचत (water saving) करणे आवश्यक आहे. तथापि, पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढील दिवस पाणीपुरवठा विस्कळित होण्याबाबतच्या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात. तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Pune district Guardian minister Chandrkant Patil) यांनी जाहीर केले. (Pune city water distribution system)
जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती (canal advisory committee) बैठका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस खासदार वंदना चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, राहूल कुल, भिमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, यंदा हवामान विभागाकडील अंदाज पाहता थोडी टंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रीमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. चाऱ्याचे नियोजन आत्ताच सुरू केले असून जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे. धरणात आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे. (PMC Pune)
पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. तथापि, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो असे लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपायोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही. शेतीसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे, असेही श्री. पाटील म्हणाले. (Irrigation)

*खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन १ मेपासून*

खडकवासला प्रकल्पातील ४ धरणात मिळून २५ एप्रिलपर्यंत ११.६१  टीएमसी पाणीसाठा आहे. त्यानुसार नियोजन करुन नवीन मुठा उजव्या कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले. पुणे महानगरपालिकेसाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे. (Pune district irrigation)
बैठकीत जुना मुठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण, खडकवासला प्रकल्प ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
000