Water Closure | पुणे शहराच्या काही भागात बुधवारी पाणी बंद!

HomeपुणेBreaking News

Water Closure | पुणे शहराच्या काही भागात बुधवारी पाणी बंद!

Ganesh Kumar Mule Apr 17, 2023 1:22 PM

Bageshwar Maharaj in Pune | बागेश्वरच्या बाबांचे घटनाविरोधी अशास्त्रीय दावे | कायदेशीर कारवाईची महा.अंनिसची मागणी
EPFO | तुम्ही नोकऱ्या बदलल्या असतील किंवा बदलणार असाल, तर EPFO ​​मधून बाहेर पडण्याची तारीख अपडेट करायला विसरू नका | संपूर्ण प्रक्रिया येथे पहा
Vishwa Marathi Sammelan 2025 | विश्व मराठी संमेलनाची उद्या सांगता होणार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती!

पुणे शहराच्या काही भागात बुधवारी पाणी बंद!

बुधवार  रोजी लष्कर पाणीपुरवठा पाणीपुरवठा केंद्रा अंतर्गत रामटेकडी मुख्य जलनलिके वरील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने लष्कर पंपिग येथील उपरोक्त पंपिगचे अखत्यारीतील तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे रामटेकडी टाकीवरील अखत्यारीतील भागाचा पुर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवणेत येणार आहे. तसेच गुरुवार रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-
लष्कर जलकेंद्र भाग :- संपुर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बु., शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरीयंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी उरुळी देवाची संपूर्ण, भेकराई नगर, मंतरवाडी.