क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे ७२ (ब) अन्वये काम तातडीने सुरू करा | रमेश बागवे
| पुणे महापालिका प्रशासनाला विविध सामाजिक संघटनाच्या शिष्टमंडळाची मागणी
पुणे | संगमवाडी येथील क्रंतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून स्मारकाचे काम सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी गृहमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी दिला आहे. तसेच सातारा रोड येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृहा मागील जागेत मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह उभारावे त्याचीही प्रशसांनाने तत्काळ दखल घ्यावी . असा विविध मागण्याचे निवेदन यावेळी पुणे महापालिका प्रशासनाला देण्यात आले.
या वेळी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे , पुणे शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री. अरविंद शिंदे, माझी महापौर सौ. कमलताई व्यवहारे, माजी नगरसेवक अविनाश बागवे ,क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले,शिवसेना नेते बाळासाहेब भांडे ,राजू अडागळे,,रवी पाटोळे ,विठ्ठल थोरात ,राजू अडागळे, राम कसबे , ॲड. राजश्री अडसूळ, अरुण गायकवाड, दयानंद अडागळे यासह विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .