Balbharati-Poud Phata road | बालभारती-पौड फाटा रोडला शिवसेना (ठाकरे गट) चा विरोध | वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन

HomeपुणेBreaking News

Balbharati-Poud Phata road | बालभारती-पौड फाटा रोडला शिवसेना (ठाकरे गट) चा विरोध | वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन

Ganesh Kumar Mule Apr 10, 2023 1:35 PM

Koregaon-Bhima | पीएमपीएमएल कडून कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन
Work on Saturday, Sunday | बोनस वेळेत अदा करण्यासाठी ऑडिटर सेवकांना शनिवार, रविवारी कामावर येण्याचे आदेश  | 18 ऑक्टोबर पर्यंत बिले तपासणीच्या वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांच्या सूचना 
FIEO – MITCON | जागतिक स्तरावर भारतीय निर्यातदारांना वाढत्या संधी | डॉ. अजय सहाय यांचे प्रतिपादन; ‘फिओ’ व ‘मिटकॉन’ यांच्यातर्फे ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’

बालभारती-पौड फाटा रोडला शिवसेना (ठाकरे गट) चा विरोध

| वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन

पुणे | महापालिकेकडून (PMC Pune) बालभारती-पौड फाटा रोड (Balbharti-Paud Fata Road) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या प्रकल्पाला शहरातील पर्यावरण प्रेमिकडून विरोध करण्यात येत आहे. भाजप मात्र या प्रकल्पाचे समर्थन करत आहे. आप आणि कॉंग्रेस ने या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यानंतर आता शिवसेना’ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivivsena) ने देखील या प्रकल्पाला विरोध केला आहे. वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन देण्यात आले आहे. अशी माहिती पक्षाचे नेते तथा माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिली आहे.
सुतार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदना नुसार पुणे मनपा मार्फत बालभारती ते पौड रस्त्याचे काम व सुतारदरा (कोथरूड) ते पंचवटी (पाषाण) व जनवाडी (गोखलेनगर) हे दोन बोगदयांचे काम ३२० कोटी रूपये खर्च करून करण्यात येणार आहे. या कामांसाठी पुणे शहरातील वेताळ टेकडी फोडण्यात येणार आहे. हे पुण्याच्या पर्यावरणाचा -हास करणारे आहे, ही टेकडी फोडल्यामुळे हजारो दुर्मिळ वृक्ष नष्ट होणार आहेत, पाण्याच्ये नैसर्गिक प्रवाह बंद होणार आहेत, उष्णता मोठया प्रमाणावर वाढणार आहे, तसेच भू-जल पातळीही मोठया प्रमाणात कमी होणार आहे. सध्या जगभर ग्लोबल वार्मिंगमुळे अनेक संकटे जगावर येत आहेत, वेताळ टेकडी फोडून पुणेकरांना महानगरपालिका वेगळ्याच संकटात ओढत आहे. कोथरूडला जाण्यासाठी पर्यायी रस्ता हवा याबाबत आमची मागणी आहे. परंतु टेकडया फोडून,पर्यावरणाचा ऱ्हास करून, पुणेकरांना संकटात टाकून नाही.
वेताळ टेकडी वाचविण्यासाठी  १५ एप्रिल रोजी सायं ५ वा वेताळबाबा चौक, ते जर्मन बेकरी असे वेताळ टेकडी बचाव कृती समिती मार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये पुणेकरांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे. यासाठी कृती समिती व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, गटनेते पृथ्वीराज सुतार, यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी उपशहरप्रमुख आनंद मंजाळकर, विभागप्रमुख प्रविण डोंगरे उपस्थित होते, या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, माजी पर्यावरणमंत्री, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार, संपर्कप्रमुख आमदार सचिनजी अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली, वेताळ टेकडी बचाव मोहिमेला  शिवसेना’ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे समर्थन देण्यात आले आहे. १५ एप्रिलच्या जनजागृती अभियानात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. असे सुतार यांनी म्हटले आहे.