Korona Virus : सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे एवढ्या रुग्णांचा झाला मृत्यू

Homeमहाराष्ट्रआरोग्य

Korona Virus : सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे एवढ्या रुग्णांचा झाला मृत्यू

Ganesh Kumar Mule Sep 22, 2021 10:49 AM

IHIP-IDSP portal | Pune Municipal Corporation is getting success in bringing disease under control!
Pune Round Table India 105 assists Sadhu Vaswani Mission Medical Complex with new ambulance purchase
Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | उत्पन्न मर्यादेबाबत पुणे महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय 

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 4938 कोरोना रुग्णांचा मृत्यू

: 1624 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या

  : विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती

पुणे, दि. 21 : पुणे विभागातील 19 लाख 25 हजार 559 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 80 हजार 823 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 393 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 871 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे.  पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 99 हजार 301 रुग्णांपैकी 1 लाख 92 हजार 739 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 624 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 938 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.21 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

: पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 32 हजार 125 रुग्णांपैकी 11 लाख 6 हजार 432 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 6 हजार 948 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.73 टक्के आहे.

: सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 46 हजार 476 रुग्णांपैकी 2 लाख 36 हजार 167 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 93 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 216 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*सोलापूर जिल्हा*

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 99 हजार 301 रुग्णांपैकी 1 लाख 92 हजार 739 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 624 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 938 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*सांगली जिल्हा*

सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 1 लाख 97 हजार 160 रुग्णांपैकी 1 लाख 90 हजार 839 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्य 1 हजार 106 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 215 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*कोल्हापूर जिल्हा*

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 5 हजार 761 रुग्णांपैकी 1 लाख 99 हजार 382 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 622 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 23 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 508, सातारा जिल्ह्यात 174, सोलापूर जिल्ह्यात 159, सांगली जिल्ह्यात 142 तर कोल्हापूर जिल्ह्यात 40 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
*कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण*
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 591 आहे. पुणे जिल्हयामध्ये 878, सातारा जिल्हयामध्ये 190, सोलापूर जिल्हयामध्ये 275, सांगली जिल्हयामध्ये 172 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 76 रुग्णांचा समावेश आहे.

 *पुणे विभागातील सर्व्हेक्षण*

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 65 लाख 16 हजार 34 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 80 हजार 823 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0