Advance | PMC Pune | उचल रकमेबाबत लेखा व वित्त विभागाचे नवीन आदेश

HomeUncategorized

Advance | PMC Pune | उचल रकमेबाबत लेखा व वित्त विभागाचे नवीन आदेश

Ganesh Kumar Mule Apr 07, 2023 6:18 AM

Ganesh Idol Immersion | गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन वाघोली येथील खाणीमध्ये | महापालिकेचे नियोजन तयार! 
Aadhaar Update | UIDAI अलर्ट | ही माहिती आधार कार्डमध्ये अपडेट न केल्यास सरकारी योजना उपलब्ध होणार नाहीत | ₹ 25 अद्यतन शुल्क आहे
Open Market | PMC | सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनानंतर महापालिकेने घेतला हा निर्णय

उचल रकमेबाबत लेखा व वित्त विभागाचे नवीन आदेश

पुणे | पुणे महानगरपालिकेतील (PMC Pune) सर्व कर्मचाऱ्यांना सणासाठी उचल म्हणून प्रचलित कार्यपद्धतीनुसार सरसकट १०,००० प्रतिवर्षी आदा करून दहा समान मासिक व्याज रहित हफ्त्यामध्ये वसुली करणे मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक खात्याकडील सेवकानुसार प्रत्येकी १०,००० प्रमाणे खात्यास एकवट रक्कमउचल म्हणून दिली जाते. त्याचप्रमाणे विविध बैठकांना जाण्यासाठी देखील उचल रक्कम दिली जाते.  सेवकाकडून १० समान हफ्त्यामध्ये वसुली करणेची जबाबदारी त्या त्या खात्याची आहे. परंतु तसे खात्याकडून होत नसल्याचे लक्षात येते. त्यामुळे लेखा विभागाने आता एक नवीन नियमावली ठरवून दिली आहे. (Pune municipal corporation)
| काय आहेत आदेश?

पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांकडून महत्वाच्या कामकाजासाठी अंदाजपत्रकीय अर्थशिर्षकातून रकमा उचल स्वरुपात मनपा कोष विभागांकडून स्विकारण्यात येतात. बहुतेक वेळा बैठकीस परगावी येणे-जाणे व तदनुषंगीक खर्चासाठी अनेक खात्याकडून उचल रकमा घेण्यात येत असतात. बैठक संपन्न झालेनंतर उचल रकमेपैकी शिल्लक पुन्हा चलनाद्वारे कोष कार्यालयात जमा केली जाते. त्याचप्रमाणे इतरही अन्य कामासाठी उचल रकमा घेण्यात येतात. तथापि काही विभागांकडून सदरची रकम वेळेवर व त्वरित कोष विभागाकडे जमा केली जात नाही.  त्याचप्रमाणे सदर रकमांचे रीकूपमेंट वेळचेवेळी केले जात नाही असे आमचे निदर्शनास आले आहे. सदरची बाब आर्थिक जमा खर्चाच्या दृष्टीने योग्य नसून याबाबत स्थानिक लेखापरीक्षण  महालेखाकार विभागाकडून आक्षेप नोंदविले जातात. (PMC Pune)

याबाबत यापूर्वी देखील  आवश्यक ती दक्षता घेणेबाबत वेळोवेळी सर्व खात्यांना कळविण्यात आले आहे. तथापि बहुतांश खात्याकडून या बाबीची दखल घेतली जात नाही व वर्ष अखेरीस जमा-खर्चाचा ताळमेळ घालताना मुख्य लेखा व वित्त विभागास मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात.
तरी यापुढे उचल रकमा बाबत  खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
१.ज्यासाठी उचल रकमा घेतल्या असतील ते काम संपन्न होताच त्वरित उर्वरित शिल्लक रक्कम महानगरपालिकेच्या कोष कार्यालयात जमा करण्यात यावी.
२. उचल रकमेपैकी शिल्लक रकम ज्या दिवशी मनपा कोष कार्यालयात जमा करणार त्याच दिवशी त्याची खर्च केलेल्या रकमेचे अॅडजेस्टमेंटचे बिल तयार करून त्याची नोंद आमचेकडील इतर खर्चासाठी उचल या रजिस्टरी होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच सदर उचल रकमेची परतजमा त्याच आर्थिक वर्षात करण्यात यावी.
३.  रकम इतर खर्चासाठी उचल या रजिस्टरी परतजमा करणेपुर्वी सर्व खात्यांनी व शाळांनी मुख्य लेखा व वित्त विभागाकडील संकलन विभागातील रूम क्र. ४३ येथे माहितगार सेवकाकडून यापूर्वीच्या शिल्लक रकमा रीकुप केल्या अगर कसे? याबाबत खातरजमा करून घ्यावी.
४. तसेच प्रथम घेतलेल्या अॅडव्हान्सची रिकुपमेंट झाल्याशिवाय नवीन अॅडव्हान्स घेता येणार नाही याची
नोंद घ्यावी.