रस्ते खोदाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन
पुणे शहरामध्ये नुकत्याच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर रिलायन्स जिओची (Reliance Jio) केबल टाकण्यासाठी खोदाईची त्वरित परवानगी पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अश्या पद्धतीने वारंवार नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांच्या कररुपी पैशाचा अपव्यय होत आहे. असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस च्या (ncp pune) वतीने महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. (Ncp agitation)
राष्ट्रवादीच्या निवेदनानुसार सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम चौक ते खुन्या मुरलीधर चौक रस्त्यावर ४-५ दिवसांपूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता ह्याच जिओ च्या केबल टाकण्यासाठी खोदाईचे काम सुरू आहे व परिसात केबल टाकण्याचे काम सुरू आहे.
अश्या पद्धतीने वारंवार नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांच्या कररुपी पैशाचा अपव्यय होत आहे. या सर्व प्रकाराला कारणीभूत असणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कसबा विधानसभा संघाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या सूचनेनुसार खून्या मुरलीधर चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पुणे मनपा प्रशासनाचा, प्रशासनावर अंकुश नसणाऱ्या पुण्याच्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो, पुणेकरांना खड्यात घालणाऱ्या पुणे मनपा प्रशासनाचा धिक्कार असो, पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो अश्या घोषणा देण्यात आल्या. (PMC Pune)
सदर प्रसंगी मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश नलावडे, रोहन पायगुडे,अजिंक्य पालकर, राहुल पायगुडे, अरूण गवले,सारिका पारेख, गजनान लोंढे,आप्पा जाधव, संजय गायकवाड, हेमंत येवलेकर, शंकर शिंदे, संतोष बनकर, हर्षवर्धन दिघे, हर्षल भोसले, मदन कोठुळे, युवराज दिसले, देवा वाल्लेकर, सागर करपे, सतिश दबडे, ऋषिकेश शहाणे, राणी शिंदे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.