पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आमदार सुनील टिंगरे यांची अधिवेशनात मागणी
पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून त्याबाबत योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून अधिवेशनात मांडण्यात आली. तसेच याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची देखील मागणी करण्यात आली. यावर एक समिती तयार करून निर्णय घेण्याचे आश्वासन सभागृहात देण्यात आले.
याबाबत आमदार टिंगरे यांनी सांगितले कि, पुणे महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा सर्वसामान्यांना होणार त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्याच महिन्यात कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली. ब्रह्मा स्काय सिटी सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका मुलाचा डोळा गेला. खराडी येथे राहणार मानित गाडेकर बाहेर खेळात असताना भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. अशाच प्रकारच्या अनेक घटना खराडी, चंदन नगर, वडगावशेरी येथे वारंवार घडत आहेत. पुणे शहरात सुमारे साडेतीन लाख भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. भटकी कुत्री माणसांवर हल्ला करत असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. लहान मुले, वयस्कर मंडळी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. एक वर्षात पुणे महापालिका हद्दीत १६ हजार ५६९ लोकांना जखमी करण्यात आले आहे. त्याच बरोबर पुणे शहरात १७ हजार १७८ कुत्र्यांची नसबंदी केले जाते. एकूण पालिका परिसरातील कुत्र्यांची संख्या पाहता हे प्रमाण अत्यल्प आहे. सोसायटी मध्येही यामध्ये दोन वर्ग पाहायला मिळतात. प्राणी प्रेमी असावं आपण सांभाळत असलेल्या कुत्रीची काळजी घेणं, त्याला योग्य ते लसीकरण करणं हि जबाबदारी शासनाबरोबरच लोकांचीही आहे. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला दिले जाते. ती कुत्री पुढेजाऊन कोणाला त्रासदायक ठरत आहेत का याचा विचार केला जात नाही. याकडे प्रशासनाने लक्ष दयायला हवे. महापालिकेने सोसायटीधारकांसाठी कडक नियमावली तयार करावी. अशा प्रकारची मागणी आम्ही आज सभागृहात केली. यावर समिती तयार करून निर्णय होईल असे आश्वासनही देण्यात आले. असे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले.
| सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टी बाधितांच्या घरांवर जप्ती आणणं ही गंभीर बाब
दरम्यान आमदार टिंगरे यांनी सभागृहात सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टी बाधितांचा प्रश्न मांडला. आमदार टिंगरे म्हणाले, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. आज या अधिवेशनात पुन्हा एकदा सिद्धार्थनगर झोपडपट्टी बाधितांच्या न्यायासाठी प्रश्न उपस्थित केला. त्याठिकाणी बँकेचे अधिकारी झोपडपट्टीवासीयांना घरे खाली करण्यासाठी दमदाटी करत असून ही कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी मी सभागृहाकडे केली. राहत्या घरात अचानक जप्ती आणणे आहि संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणणे हि बाब चुकीची आहे. हि कारवाई त्वरित थांबवावी आणि यावर शासनाने लक्ष घालून योग्य तो मार्ग काढावा यासाठी मी समस्त रहिवाशांच्या वतीने हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर सिद्धार्थनगर झोपडपट्टी बाधितांचा हा प्रश्न अत्यंत गंभीर असून येथील रहिवाशांना एसआरए स्कीममधून घरे देण्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांना फोटो पास देण्यात आलेले आहेत. हे फोटो पास मॉरगेज करून त्यावर बँक लोन देते. मुळात ही जागा सरकारची आहे, त्यावर मॉरगेज लोन देणे हेच चुकीचे आहे आणि त्या घरांवर जप्ती आणणे हे त्याहीपेक्षा गंभीर आहे. त्यामुळे शासनाने या बाबीची त्वरित नोंद घ्यावी आणि उपाययोजना करावी, असे आदेश सभागृह अध्यक्षांनी दिले आहेत. असे आमदार टिंगरे यांनी सांगितले.