G 20 in pune | जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या(IWG) दोन दिवसीय बैठकीचा आज  पुण्यामध्ये होणार प्रारंभ

HomeBreaking Newsपुणे

G 20 in pune | जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या(IWG) दोन दिवसीय बैठकीचा आज  पुण्यामध्ये होणार प्रारंभ

Ganesh Kumar Mule Jan 16, 2023 2:56 AM

G 20 Conference | 16 आणि 17 जानेवारीला जी20 परिषदेच्या पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक पुण्यामध्ये
Marathi culture | G 20 | परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका
Economic recession | देशात जूननंतर आर्थिक मंदी येऊ शकते

जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या(IWG) दोन दिवसीय बैठकीचा आज  पुण्यामध्ये होणार प्रारंभ


जी 20 पायाभूत सुविधा कार्यगटाचे भारतासोबत ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील भूषवणार सहअध्यक्षपद

 

भारताच्या जी 20 अध्यक्षते अंतर्गत जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या(IWG) पहिल्या बैठकीचे पुण्यामध्ये 16-17 जानेवारी 2023 रोजी आयोजन होणार आहे. या बैठकीमध्ये आयडब्लूजी सदस्य देश, अतिथी देश आणि भारताने निमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना भारताच्या जी20 अध्यक्षतेंर्गत 2023 पायाभूत सुविधा जाहीरनाम्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. सरकारच्या अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग या दोन दिवसीय बैठकांचे यजमानपद भूषवेल तर ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिल बैठकांचे सहअध्यक्षपद भूषवतील. पुण्यामधील पहिल्या आयडब्लूजी बैठकीमध्ये जी20 सदस्य देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 65 प्रतिनिधी सहभागी होतील.

जी20 पायाभूत सुविधा कार्यगट मालमत्ता श्रेणी म्हणून विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधा गुंतवणुकीचे विविध पैलू, दर्जेदार पायाभूत सुविधा गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधा गुंतवणुकीसाठी आर्थिक संसाधने जमा करण्यासाठी नवोन्मेषी साधनांची निवड करणे या विषयांवर विचारमंथन करतो. पायाभूत सुविधा कार्यगटाची फलनिष्पत्ती जी20 फायनान्स ट्रॅक प्राधान्यक्रमांमध्ये आर्थिक वृद्धीच्या सामाईक उद्दिष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरली जाते.

गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा कार्यगट मालमत्ता श्रेणी मालमत्ता श्रेणी म्हणून विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधा, दर्जेदार पायाभूत सुविधा गुंतवणूक (QII) निर्देशांकांना प्रोत्साहन, पायाभूत सुविधा जाहीरनामा यांसारख्या प्रमुख संकल्पनांवर भर देत आहे.

भारताच्या जी20 अध्यक्षतेची ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना 2023च्या भारताच्या जी20 अध्यक्षतेअंतर्गत 2023च्या पायाभूत सुविधा जाहीरनाम्यासाठी पोषक वातावरण निर्माण करते. ही संकल्पना समन्यायी वृद्धीचा संदेश अधोरेखित करते आणि लवचिक , समावेशक आणि शाश्वत शहरी पायाभूत सुविधांची उभारणी करत असलेल्या चर्चेच्या केंद्रीय जाहीरनाम्यासोबत यथार्थाने जोडली जाते. ही संकल्पना यापूर्वीच्या अध्यक्षतांच्या अंतर्गत पायाभूत सुविधा जाहीरनाम्यावर झालेल्या कामासोबतही संलग्न आहे.

पुण्याच्या बैठकीत होणाऱ्या चर्चांमध्ये भारतीय अध्यक्षतेंर्गत पायाभूत सुविधा कार्यगटासाठीच्या जाहीरनाम्यावर भर दिला जाईल. ” उद्याच्या शहरांना अर्थसाहाय्य: समावेशक, लवचिक  आणि शाश्वत” हा या बैठकीत चर्चिला जाणारा प्राधान्यक्रमाचा अग्रणी विषय आहे. शहरांना वृद्धीचे आर्थिक केंद्र बनवणाऱ्या विविध पैलूंवर, शहरी पायाभूत सुविधांना अर्थसाहाय्य, भविष्यात उपयुक्त असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी, उर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही शाश्वत पायाभूत सुविधांना खाजगी अर्थपुरवठा उपलब्ध करण्यासाठी वित्तीय गुंतवणुकीला दिशा देण्यावर आणि सामाजिक असंतुलन कमी करण्यावर ही संकल्पना भर देईल.

पुण्यातील जी-20 बैठकीदरम्यान, ‘भविष्यातील शहरांसाठी वित्तपुरवठा’ या विषयावर एक कार्यशाळाही होईल. या कार्यशाळेत,उद्याच्या म्हणजेच भविष्यातील शहरांच्या उभारणीसाठी, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षमतांच्या अनुषंगाने, काही संकल्पनांवर देखील चर्चा होईल. तसेच, खाजगी वित्तपुरवठा वाढवण्यासाठी, गुंतवणूकदारांचे प्रश्न समजून घेणे आणि भविष्यातील शहरांच्या वित्तीय क्षमता, यावरही चर्चा होईल.

या जी-20 बैठकीला, लोकसहभागाचीही जोड देण्यात आली आहे.  यासाठी, जी-20विषयी माहिती देणारी व्याख्याने,शहरांना भविष्यासाठी सज्ज करण्याविषयीचा परिसंवाद, नगरविकासाचे महत्त्व, अशा विविध विषयांवर कार्यक्रम झाले. तसेच, सर्वसामान्य लोकांमध्ये या विषयावर जनजागृती करण्यासाठी, जी-20 सायक्लोथॉन आणि शिक्षण संस्थांमध्ये मॉडेल जी-20 या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांचा भाग म्हणून, आंध्र प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यातील महापालिका आयुक्तांसह 300 हून अधिक लोक, शहरी तज्ञ आणि देशभरातील उद्योग प्रतिनिधी 13 जानेवारी 2023 रोजी पुण्यात शहरी पायाभूत सुविधांवर राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रात सहभागी झाले होते.या उपक्रमांचा उद्देश, जी-20 च्या सर्व संकल्पनांशी समाजातील सर्व स्तरातल्या लोकांना सामावून घेणे हा होता.

भारताच्या जी- 20 अध्यक्षपदाच्या काळात, जी-20 पायाभूत सुविधा कार्यगटाचा उपयोग, शहरांना भेडसावणारी आव्हाने आणि शहरांना नजीकच्या भविष्यात आणणाऱ्या संधींबद्दल चर्चा करण्यासाठी आणि शहरांना राहण्यायोग्य बनवण्यासाठी, भविष्यातील मार्ग तयार करण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणून वापरला जाईल.

येत्या दोन दिवसांत, पुणे शहरात जी-20 च्या विविध औपचारिक बैठका आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 16 जानेवारीला, भारताच्या अध्यक्षपदाखाली, पायाभूत कार्यगटाची पहिली बैठक होईल. या बैठकीच्या पहिल्या भागात, आयडब्ल्यूजीचे प्रतिनिधी, अनेक औपचारिक बैठका घेतील, आणि 2023 च्या पायाभूत सुविधा अजेंडयावर चर्चा करतील.दुपारच्या सत्रात, हे प्रतिनिधी पुणे विद्यापीठाला वृक्षारोपणासाठी भेट देतील, त्यानंतर “उद्याच्या शहरांसाठी वित्तपुरवठा” या विषयावर उच्चस्तरीय कार्यशाळा होईल. दिवसाची सांगता रात्रीच्या मेजवानीने होईल आणि त्यासोबतच, पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमांची सांगता होईल.

17 जानेवारी 2023 रोजी, पायाभूत सुविधा कार्यगट चार सत्रांमध्ये चर्चा करेल, त्यानंतर आभारप्रदर्शन होऊन पुण्यातील या दोन दिवसीय बैठकीची सांगता, निरोप समारंभ आणि मेजवानीने होईल.

या औपचारिक चर्चेचा एक भाग, परदेशी प्रतिनिधींना शहरातील समृद्ध संस्कृती आणि प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवणे हा ही आहे. त्यादृष्टीने, पुणे हेरिटेज वॉक, शहर दर्शन आणि महाबळेश्वरची सहल अशा सहलींची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

जी-20 पायाभूत सुविधा कार्यगटाचे नेतृत्व, केंद्रीय वित्त मंत्रालय करत असून, नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तसेच, त्याबद्दल सामूहिक कृतीला गती दिली जाईल, हे वित्त मंत्रालय सुनिश्चित करेल.