World AIDS Day | जागतिक एड्स दिनानिमित्त महापालिकेकडून पोस्टर व रांगोळी प्रदर्शन 

HomeपुणेBreaking News

World AIDS Day | जागतिक एड्स दिनानिमित्त महापालिकेकडून पोस्टर व रांगोळी प्रदर्शन 

Ganesh Kumar Mule Dec 01, 2022 12:54 PM

Property Tax collection | मिळकतकर वसुलीसाठी 75 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज  | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 
PMC Pune | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना उद्या (शनिवारी) मनपा भवनात हजर राहणे आवश्यक  | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 
Grievance Management System | काम न करताच होत आहे तक्रारींचे निराकरण | आता प्रशासन अधिकाऱ्यांना धरले जाणार जबाबदार 

जागतिक एड्स दिनानिमित्त महापालिकेकडून पोस्टर व रांगोळी प्रदर्शन

पुणे | जागतिक एड्स दिन (International AIDS Day) १ डिसेंबर  रोजी पुणे महानगरपालिका (PMC Pune) येथे  रविंद्र बिनवडे, अति. महापालिका आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका व डॉ. आशिष भारती, आरोग्य अधिकारी,  डॉ. सुर्यकांत देवकर, सहा. आरोग्य अधिकारी तथा एड्स नोडल अधिकारी, पुणे महानगरपालिका यांच्या उपस्थितीत रांगोळी प्रदर्शन व पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. (Pune Municipal corporation)

जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2022 व जनजागृती सप्ताह निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेमार्फत रांगोळी व पोस्टर प्रदर्शन, जनजागृती रॅली, पुणे शहरातून डिस्प्ले व्हॅनद्वारे जनजागृती, पथनाट्याद्वारे जनजागृती, सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, प्रसुतीगृहे यातून जनजागृती, सर्व खाजगी, सरकारी, मनपा माध्यमिक शाळांतून जनजागृती महाविद्यालयातून एन.एस.एस. विभागामार्फत जनजागृती, रेड लाईट एरियातील महिलांसाठी महिला मेळावा कार्यक्रमातून जनजागृती, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतून जनजागृती, युवक व युवतींसाठी जनजागृती कार्यक्रम तसेच व सर्व कार्यक्रमातून आय.ई. सी. वितरण, इ. चे आयोजन करणेत येत आहे.

या कार्यक्रमास पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेकडील स्टाफ व आरोग्य विभागातील सेवक, इ. उपस्थित होते.
तसेच पुणे महानगरपालिका व मुक्ती उधारण सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व वंचित विकास, सहेली, मंथन, अलका फौंडेशन, व इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने सावित्रीबाई फुले बचत गट भवन, लोहीया नगर पासून ते मीठगंज पोलीस चौकी चौक, कस्तूरी चौक, रवीवार पेठ, फुलवाला चौक, जम्न मंदिर, नेहरू चौक ते सार्वजनिक सभागृह, रामेश्वर मार्केट, बुधवार पेठ येथे सांगता करण्यात आली. तसेच रॅली मार्गावर पथनाटय व एच. आय. व्ही. एड्स बाबत जनजागृती करण्यात आली.