7th Pay Commission | Pune PMC News |  7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा | वेतन प्रणालीचे जुने सॉफ्टवेअर आता बंद होणार!

HomeBreaking Newsपुणे

7th Pay Commission | Pune PMC News | 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा | वेतन प्रणालीचे जुने सॉफ्टवेअर आता बंद होणार!

गणेश मुळे Jun 08, 2024 7:35 AM

Good news for Central Government Employees | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी | हा भत्ता लवकरच 3% ने वाढेल 
PMC : 7th pay commission : वेतन लवकर करण्यासाठी प्रशासनाची लगबग  : बिल लेखनिकांना शनिवार, रविवारी काम करण्याचे आदेश 
DA Hike | राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा

7th Pay Commission | Pune PMC News |  7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा

| वेतन प्रणालीचे जुने सॉफ्टवेअर आता बंद होणार!

PMC Pay roll and Pension Software – (The Karbhari News Service) पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी (PMC Employees and Officers) आनंदाची बातमी आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (7th Pay Commission)आधीच लागू झाला आहे. कर्मचाऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम आधीच मिळाली आहे. त्यानंतर आता तिसरा हफ्ता देखील खात्यात जमा झाला आहे. दरम्यान मे महिन्याचा पगार देखील आगामी आठवड्यात जमा होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना अ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हप्त्याची रक्कम रोखीने अदा करणेस  मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यानुसार पहिले दोन हफ्ते मिळाले होते. तिसरा हफ्ता हा जून महिन्यात देणार असे प्रशासना कडून जाहीर करण्यात आले होते. मात्र 5 तारीख उलटून गेली तरी फरक मिळाला नव्हता. अखेर शुक्रवारी संध्याकाळी कर्मचाऱ्यांच्या खात्यात फरकाची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामध्ये पेन्शन धारकांचा देखील समावेश आहे. जवळपास 150 कोटींच्या आसपास ही रक्कम आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

–  वेतन प्रणालीचे जुने सॉफ्टवेअर बंद होणार

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन देण्यासाठी 2013 साली वेतन प्रणाली बनवण्यात आली होती. मात्र ही प्रणाली जुनी झाली आहे. यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत. तसेच तत्कालीन शिक्षण मंडळाचा देखील महापालिकेत समावेश झाला आहे. याआधी महापालिका कर्मचारी आणि शिक्षण विभाग वेतनासाठी स्वतंत्र प्रणाली होती. यामध्ये कर्मचाऱ्यांना खूप करावे लागायचे. शिवाय वेतन देखील वेळेवर होत नसायचे. तसेच काही कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात तांत्रिक अडचणी आल्या तर सगळ्याच कर्मचाऱ्यांना वेतनासाठी थांबावे लागत आहे. मात्र आता नवीन प्रणाली मध्ये या सगळ्या अडचणी दूर करण्यात येणार आहेत. pay roll आणि pension  दोन्ही एकाच प्रणालीत आणले जाणार आहे.
नवीन वेतन प्रणाली बाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यापासून जुन्या आणि नवीन प्रणालीत पगारबिले तयार केली जात आहेत. तसेच बिले व्यवस्थित येतात का याबाबत खातरजमा केली जात आहे. त्यानुसार आता येत्या 15 तारखेपासून जुनी वेतनप्रणाली पूर्णपणे बंद केली जाणार आहे. पुढील वेतन हे नवीन प्रणालीनुसार केले जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनासाठी रखडावे लागणार नाही. अशी शक्यता आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.