7th Pay Commission | PMC Pune retired employees | 2016 नंतरच्या सेवानिवृत्त सेवकांना 7 व्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळणे सुरु | 254 लोकांची बिले तपासून पूर्ण | 135 सेवकांना दिले चेक
| मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची माहिती
7th Pay Commission | PMC Pune retired employees | पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) कर्मचारी, अधिकारी तसेच सेवानिवृत्त सेवक यांना सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू झाला आहे. मात्र 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना (PMC retired employees) अजूनही सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन मिळत नव्हती. याबाबत सह महापलिका आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर (Chief finance officer Ulka kalaskar) यांनी गंभीरपणे पाऊले उचलत सेवकांना लाभ मिळवून देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 254 लोकांची बिले तपासून पूर्ण झाली असून 135 सेवकांना चेक दिले आहेत. तसेच 2016 च्या आधीच्या लोकांना सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन देखील सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती कळसकर यांनी दिली. (7th pay commission: PMC Pune retired employees)
पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) मुख्य लेखा व वित्त विभागाकडील निवृत्तीवेतन विभागामार्फतच्या सेवानिवृत्त सेवकांच्या (PMC retired employees) निवृत्तीवेतनाबाबतची सर्व कार्यवाही करणेत येते. महापालिका कर्मचाऱ्यांना ०१/०१/२०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करणेत आला आहे. सध्या ०१/०१/२०१६ ते ३१/१०/२०२१ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे (6th Pay Commission) पेन्शन (pension) अदा करणेत येत होती. याबाबत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. यामुळे या कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन सातव्या वेतन आयोगाच्या तरतूदींप्रमाणे दुरूस्त करणे, त्यांना निवृत्तिवेतनातील अंशराशीकरणातील तसेच तोषदानातील फरकाच्या रकमा लवकरात लवकर अदा आवश्यक होते. त्यानुसार लेखा व वित्त विभागाने गंभीरपणे पाऊल उचलत पेन्शन देण्यास सुरुवात केली आहे. (Pune Municipal Corporation News)
कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 नंतरचे सेवानिवृत्त झालेले एकूण 2595 कर्मचारी आहेत. यापैकी 1600 हून अधिक प्रकरणे आमच्याकडे विविध खात्याकडून प्राप्त झाली आहेत. त्यापैकी 1350 प्रकरणे आम्ही चीफ ऑडिट विभागाकडे पाठवली. त्यातील 1000 प्रकरणे मान्य झाली आहेत. त्यातील 254 लोकांची बिले तपासून पूर्ण झाली असून 135 लोकांना त्यांचे चेक देखील देण्यात आले आहेत. आगामी 3 ते 4 महिन्यात सर्वच लोकांची बिले तपासून त्यांचे चेक दिले जातील. कळसकर यांनी पुढे सांगितले कि, 2016 पूर्वीचे 9658 कर्मचारी होते. या सर्वांना सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन देण्यात येत आहे. विविध खात्याकडे जी प्रलंबित प्रकरणे आहेत ती खात्यांनी लवकरात लवकर आमच्याकडे पाठवून द्यावी. असे आवाहन देखील कळसकर यांनी केले आहे. (PMC Pune News)
—-
News Title | 7th Pay Commission | PMC Pune retired employees | Post 2016 retired servants start getting pension as per 7th Pay Commission Completed by checking bills of 254 people | Checks issued to 135 servants