7th Pay Commission Latest News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी |  7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!

HomeपुणेBreaking News

7th Pay Commission Latest News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!

गणेश मुळे May 16, 2024 1:12 PM

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्ता भेट मिळाला का?  सर्क्युलर व्हायरल झाले | पण… थांबा आणि काळजीपूर्वक वाचा 
Pune Municipal Corporation | सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात नोंदीच केल्या नाहीत
PMPML : Hemant Rasane : Standing Commitee : पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा 

7th Pay Commission Latest News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

|  7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी (PMC Employees and Officers) आनंदाची बातमी आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (7th Pay Commission)आधीच लागू झाला आहे. कर्मचाऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम आधीच मिळाली आहे. आता तिसरा हफ्ता देखील लवकरच मिळणार आहे. याबाबतचे सर्क्युलर लेखा व वित्त विभागाकडून (PMC Finance Department) जारी करण्यात आले आहे. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना अ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हप्त्याची रक्कम रोखीने अदा करणेस  मान्यता प्राप्त झालेली आहे.

| सर्क्युलर मध्ये काय म्हटले आहे?

7 व्या वेतन आयोगानुसार पुणे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्कम रोख स्वरुपात अदा करण्यासाठी संगणक प्रणाली (व्हर्जन) माहिती व तंत्रज्ञान विभागाने त्वरित प्राप्त करून दद्यायची आहे. तसेच
तिसऱ्या हप्त्याची बिले 27 मे अखेर ऑडीट विभागातून तपासून घ्यायची आहेत. तसेच आयकर कपात करण्याबाबत सुविधा संगणक प्रणाली (व्हर्जन) माहिती तंत्रज्ञान विभागाने प्राप्त करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्क्युलर मध्ये पुढे म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेतील जे अधिकारी, कर्मचारी 1 जून 2016  नंतर सेवानिवृत्त झालेले आहेत, अशा अधिकारी, कर्मचारी व मयताचे वारस यांना ७ व्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2016 ते सेवानिवृत्ती दिनांकापर्यंत 7 व्या वेतन आयोगाचा तिसऱ्या हप्त्याची बिले 27 मे अखेर ऑडीट विभागाकडून तपासून घ्यायची आहेत.

2024-25 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये यासाठी 40 कोटी आवश्यक तरतूद उपलब्ध असून सदर बिले वरील अर्थशिर्षकावर खर्ची टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  6 व्या वेतन आयोगाच्या वेतन आकारणी व वेतन फरक हप्त्यांची ज्याप्रमाणे नोंदी सेवापुस्तकामध्ये करणेत आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे 7 व्या वेतन आयोगापोटी कर्मचाऱ्यांना अदा केलेल्या हप्त्याची व पुढील मिळणाऱ्या हप्त्याची तसेच, विवरण पत्रातील वेतनासंबंधीची नोंद सेवापुस्तकामध्ये संबंधीत पगार बिल लेखनिकांनी ठेवणे आवश्यक आहे. तरी, सर्व खातेप्रमुख यांनी त्याचे नियंत्रणाखालील सर्व संबंधीत बिल लेखनिकांना त्या सूचना देण्याची तजवीज करावी. असे देखील वित्त व लेखा विभागाने म्हटले आहे.