शहीद जवानाच्या मुलांना शिक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून 5 लाखाची मदत
| तुषार पाटील व अर्चना पाटील यांनी घरी जाऊन कुटुंबियांना दिला चेक
| भवानी पेठ भागातील शहिद वीर जवान कै. दिलीप ओझरकर (Dilip Ozarkar) यांच्या तेरावा विधीनिमित्त पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित राहत श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी या या वीर जवानाच्या कुटुंबाला पाहून भावना अनावर होऊन दादांनी तत्क्षणी त्यांना मदत करण्याची घोषणा केली होती. या दिलेल्या शब्दानुसार दादांनी भाजपतर्फे या शहीद जवानांच्या दोन्ही चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश आज भाजप पुणे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील व मा. स्थायी समिती सदस्य अर्चना पाटील यांच्या मार्फत कुटुंबीयांना दिला.
देशासाठी बलिदान दिलेली व्यक्ती जरी परत येणार नसली तरी, त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा दिलेला हा हात आयुष्य थोडेफार सुकर करेल. यावेळी शहीद कुटुंबातील जवानाची पत्नी, त्यांचे चिमुकली मुले आणि आई वडील उपस्थित होते. तसेच त्यावेळी स्थानिक गणपती मंडळाचे अध्यक्ष नीलेश राऊत, उमेश यादव, संध्या पवार दिनेश रासकर, राहुल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
दादांच्या या कृतीमुळे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या मागे ठामपणे उभा असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली.