PMC Pune | ४५ वर्षावरील कामगारांना कामावरून कमी न करण्याचे प्रशासनाचे संकेत!  | आयुक्तासमोर सकारात्मक निवेदन ठेवले जाणार

HomeपुणेBreaking News

PMC Pune | ४५ वर्षावरील कामगारांना कामावरून कमी न करण्याचे प्रशासनाचे संकेत! | आयुक्तासमोर सकारात्मक निवेदन ठेवले जाणार

Ganesh Kumar Mule Dec 24, 2022 2:41 AM

PMC Pune Encroachment Action |पुणे महापालिका कर्मचारी उद्या करणार काम बंद आंदोलन!
Merged Villages | समाविष्ट 23 गावातील 408 कर्मचाऱ्यांचे महापालिकेत समावेशन | महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आदेश
PMPML | Omprakash Bakoriya | पीएमपी कर्मचाऱ्यांना दिवाळीची बंपर भेट | ओमप्रकाश बकोरिया यांचा पहिलाच निर्णय कामगारांच्या हिताचा

४५ वर्षावरील कामगारांना कामावरून कमी न करण्याचे प्रशासनाचे संकेत!

| आयुक्तासमोर सकारात्मक निवेदन ठेवले जाणार

वर्षानुवर्षे महापालिकेत कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्यांना आता ‘तुम्ही वयाची ४५ वर्षे ओलांडली आहेत. कामावर येऊ नका, घरी बसा’, असे सांगण्यात आले आहे. या आदेशाने महापालिका कामगारांचे धाबे दणाणले होते. मात्र याला जिल्हा सुरक्षा मंडळ सहित राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता या कामगारांना कामावरून कमी न करण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करत आहे. तसा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला जाणार  आहे. त्यामुळे या कामगारांना दिलासा मिळणार आहे.

या कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने राष्ट्रीय मजदूर संघाने पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे याची तक्रार केली. त्यानुसार ४५ वयाच्या अटीवर आक्षेप घेऊन हा निर्णय मागे घ्यावा, असे आदेश दिले आहेत. मंडळाने  महापालिकेला खरमरीत पत्र पाठवून सुरक्षा रक्षकांचे निवृत्तीचे वय ठरविण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत. सुरक्षारक्षकांना कामावरून काढून टाकणे बेकायदा आहे, त्यामुळे त्यांना कामावर घ्यावे, असा आदेश मंडळाचे सचिव श्री. ह. चोभे यांनी दिला होता. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी देखील याविरोधात आवाज उठवला आहे. सगळीकडून विरोध झाल्यामुळे आता या कामगारांना कामावरून कमी न करण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करत आहे. सुरक्षा विभागाकडून तसा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला जाणार  आहे. त्यामुळे या कामगारांना दिलासा मिळणार आहे.