DA | PMC | सुधारित दराने महागाई भत्त्याचा 4 महिन्याचा फरक मे पेड इन जून वेतनात

HomeपुणेBreaking News

DA | PMC | सुधारित दराने महागाई भत्त्याचा 4 महिन्याचा फरक मे पेड इन जून वेतनात

Ganesh Kumar Mule May 23, 2022 9:41 AM

7 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : डीए 3 टक्क्यांनी वाढेल
7th pay Commission |केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!  | नवीन वर्षात महागाई भत्ता (DA) मोजण्याचे सूत्र बदलणार!
Dearness Allowance (DA) | मनपा कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता (DA) देण्याबाबतचे परिपत्रक जारी  |  फरकासह महागाई भत्ता नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनातून दिला जाणार 

सुधारित दराने महागाई भत्त्याचा 4 महिन्याचा फरक मे पेड इन जून वेतनात

: महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे : महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना केंद्र सरकारी सेवकाप्रमाणे महागाई भत्ता जसाच्या तसा लागू केला जातो. 1 जानेवारी पासून 7 व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करून तो 34% करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यास महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार  जानेवारी ते एप्रिल अशा चार महिन्याचा सुधारित दराने फरक  मे पेड इन जून वेतनात देण्यात येणार आहे. नुकतेच याबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाने जारी केले आहेत.

पुणे महानगरपालिका अधिकारी / सेवकांना दिनांक ०१.११.१९७७ पासून मे केंद्र शासनाचे सेवकांप्रमाणे महागाई भत्ता देण्यास तसेच त्या मध्ये वेळोवेळी होणारे बदल जसेच्या तसे लागू करण्यास  मनपा सभा २३.१२.१९७७ ने धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत दिनांक ०१ / ०१ / २०२२ पासुन ३१% दराने महागाई भत्ता आदा करण्यात येत आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी  कर्मचाऱ्यांसाठी  महागाई भत्त्याचा दर दिनांक ०१/०१/२०२२ पासुन ३१% वरून ३% ने वाढवून ३४ % इतका करण्यात आलेला आहे. हा ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित दर ३% वाढवून ३१% वरून ३४% इतका करणेत आला आहे. सदरचा दर ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात आलेल्या वेतन श्रेण्यांना लागू करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेतील अधिकारी / सेवकांना व सेवानिवृत्ती अधिकारी / कर्मचारी सेवकांना कुंटूंबनिवृत्ती वेतनधारक यांना
दिनांक ०१/०१/२०२२ पासुन ३% दराने महागाई भत्ता वाढवुन म्हणजेच एकुण ३४% दराने महागाई भत्ता फरकासह आदा करणेस आयुक्त यांची  प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

त्यानुसार  माहे जाने २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (३१% वरून ३४%) या दराने अदा केला जाणार आहे. तसेच माहे जाने २०२२ ते एप्रिल २०२२ या चार महिन्याचे ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (३१% वरून ३४%) फरक माहे मे २०२२ पेड इन जुन २०२२ चे वेतनातून अदा करणेस मान्यता दिली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जाईल.