पहिल्या दिवशी 37 हजार तर दुसऱ्या दिवशी 18 हजार लोकांचा पुणे मेट्रोने प्रवास
: पुणे मेट्रोला उदंड प्रतिसाद
पुणे : मेट्रोचे पंतप्रधान. नरेन्द्र मोदी यांनी उदघाटन केल्यानंतर दुपारी ३ वाजेपासून गरवारे ते वनाज , आणिपीसीएमसी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो सेवा सुरु करण्यात आली. दुपारी २ वाजल्यापासून स्थानकांवर लोक येण्यास सुरवात झाली.
पुणेआणि पीसीएमसी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. मोठ्यासंख्यने गृहिणी , जेष्ठ नागरिक , महाविद्यालयीन विध्यार्थी , लहान मुले , संपूर्ण कुटुंब , महाविद्यालयीन ग्रुप इत्यादी नागरिक मोठ्या उत्साहाने मेट्रो स्थानकांवर येत होते आणि मेट्रोने प्रवास करत होते.
पुण्यात मेट्रो रेल्वे चालू होऊन पहिल्याच दिवशी म्हणजे ६ मार्च२०२२ रोजी दुपारी ३ ते रात्री ९:३० पर्यंत ३७७५२ लोकांनी प्रवास केला. प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. गरवारेस्थानकात असलेली प्रदर्शनी हा एक सेल्फी पॉईंट झाला आहे. मेट्रोमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर प्रवासी फोटो, सेल्फी , घेत होते. पूर्ण स्टेशनजय भवानी , जय शिवाजी , गणपती बाप्पा मोरया अश्या घोषणांनी दुमदुमले होते.
दि. ०७.०३.२०२२ रोजी देखील तेवढ्याच उत्साहाने नागरिक मेट्रोरेल्वे स्थानकात येत होते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत १८४३९ प्रवाश्यानीमेट्रो सेवेचा वापर केला. त्यामध्ये पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वनाज तेगरवारे या मार्गिके मध्ये प्रवास केला आहे.
COMMENTS