राष्ट्रवादीचे 26 नगरसेवक भाजपात येताहेत… पण …!
पुणे : भाजपचे 16 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा प्रभाग रचना जाहीर झाल्याबरोबर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला होता. त्यावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २६ नगरसेवक भाजपात येताहेत असा दावा मी पण करू शकतो. पण खोटे दावे करण्याची मला सवय नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने कितीही दावा केला तरी घोडा मैदान जवळ आहे, काय होतंय ते पाहू. असा टोला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
: राष्ट्रवादी शहर अध्यक्षांनी केला होता दावा
प्रभाग रचनेची फोडाफोडी आणि तोडफोड ही भाजपने महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. प्रशासनाने दिलेली प्रभागरचना स्वीकारणे हे आमचे पूर्वीपासूनच धोरण आहे. भाजपचे शहराध्यक्ष 100 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्या आसपासचे लोक टिकवून ठेवावेत. सध्या आमच्याकडे त्यांच्या १६ नगरसेवकांची यादी आहे. त्यांचे प्रवेश केव्हा घ्यायचे हे वरीष्ठांशी चर्चा करून ठरवले जाईल असा खुलासा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला होता. प्रशासनाने जाहीर केलेली प्रभाग रचना पाहता निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 122 जागा स्वबळावर जिंकू शकते. त्यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली होती. त्यावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २६ नगरसेवक भाजपात येताहेत असा दावा मी पण करू शकतो. पण खोटे दावे करण्याची मला सवय नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने कितीही दावा केला तरी घोडा मैदान जवळ आहे, काय होतंय ते पाहू. असा टोला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
COMMENTS