Unauthorized Stalls Selling Ganpati Idols | पुणे शहरात गणपती मुर्ती विक्रीचे 222 अनधिकृत स्टॉल | १९५ लोकांना दिली नोटीस

HomeपुणेBreaking News

Unauthorized Stalls Selling Ganpati Idols | पुणे शहरात गणपती मुर्ती विक्रीचे 222 अनधिकृत स्टॉल | १९५ लोकांना दिली नोटीस

Ganesh Kumar Mule Aug 29, 2022 5:08 PM

City Hawkers Committee Election | नगर पथविक्रेता समिती  निवडणुकीसाठी येणार २८ लाखाचा खर्च!
Scrap Vehicles : PMC : बेवारस गाड्याने  बालेवाडीचे गोडाऊन ‘फुल्ल’!  : पाषाण ला नवीन गोडाऊन करणार 
Pune | Traffic Congestion | गणेश मंडळाच्या मांडवाने वाहतूक कोंडी | कारवाई करण्याबाबत अतिक्रमण विभाग उदासीन  | मंडळांना 14 सप्टेंबर ची दिली होती मुदत 

पुणे शहरात गणपती मुर्ती विक्रीचे 222 अनधिकृत स्टॉल | १९५ लोकांना दिली नोटीस

शहरात स्टॉल थाटून गणपती मुर्तींची विक्री करणारे अनधिकृत २२२  स्टॉलधारक आढळले आहेत. त्यापैकी १९५  जणांना आतापर्यंत नोटीस देण्यात आली आहे. तर २५ लोकांनी stall काढून घेतले आहेत. अनधिकृत स्टॉलधारकांविरोधातील सर्व पुरावे गोळा करून पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे महापालिकेच्या  अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले. १९ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे.

वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या बेकायदा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू आहे. तसेच गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगीनुसारच मंडप उभारलेत का याचीही तपासणी सुरू आहे. अतिक्रमण निरीक्षकांच्या पाहाणीमध्ये शहरात विविध ठिकाणी अनधिकृतरित्या २२२  गणेश विक्रीचे स्टॉल उभारण्यात आल्याची बाब समोर आली आहे. विशेष असे की महापालिकेने शहराच्या विविध भागामध्ये गणेश विक्रीच्या स्टॉल्ससाठी ओपन स्पेसेस उपलब्ध करून दिल्यानंतरही एवढ्या मोठ्या संख्येने अनधिकृत स्टॉल्स उभारले आहेत. यापैकी १९५  स्टॉल धारकांना नोटीस बजावण्यात आली असून उर्वरीत स्टॉलधारकांना पुढील दोन दिवसांत नोटीस बजावण्यात येईल.
स्टॉलच्या ठिकाणाचे जीओ मॅपिंग व विक्रेत्यांची संपुर्ण माहिती घेउन संबधित पोलिस ठाण्याकडे देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश अतिक्रमण निरीक्षकांना देण्यात आले आहेत.

अतिक्रमण विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत १५४७ मंडळांना मंडप परवाने देण्यात आले आहेत. यामध्ये २०१९ नुसार परवाना दिलेल्या मंडळाची संख्या ११८८ इतकी आहे.