राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील   : शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका   : राष्ट्रवादीने शब्द पाळला – पवार

Homeमहाराष्ट्र

राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील : शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका : राष्ट्रवादीने शब्द पाळला – पवार

Ganesh Kumar Mule Sep 04, 2021 1:12 PM

Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Shasan Aaplya Dari | शासन आपल्या दारीला मिळणार महालाभार्थी पोर्टलची जोड
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे पत्र व्हायरल!

राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील 

 

: शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका 

 

: राष्ट्रवादीने शब्द पाळला – पवार 

पुणे: गेल्या कित्येक  दिवसांपासुन प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दल आज शरद पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. १२ आमदारांची यादी आम्ही राज्यपालांकडे पाठवली असून राज्यपाल त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतील असे शरद पवार यांनी यावेळी केले आहे. या यादीतुन राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आल्याच्या  प्रश्नाला उत्तर देताना याबद्दल राज्यपाल निर्णय घेतील. अशी भूमिका आता शरद पवार यांनी घेतली आहे.

: राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा 

 
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दल मागच्या दोन दिवसांपासुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच या यादीतुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांचे या यादीतुन वगळल्याच्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार यांनी सांगितले की, राज्यपालांकडे दिलेल्या यादीतून आम्ही राजू शेट्टी यांचे नाव वगळले नाही. ते नाराज असतील याची मला माहिती नाही. आम्ही जे नाव राज्यपाल यांना दिली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी शेती व सहकार क्षेत्रात काम केलं आहे, म्हणुन त्यांना घ्यावं अस सागितले आहे. अजून त्यावर निर्णय झाला नाही. मी दिलेला शद्ब पाळला आहे. राजू शेट्टी यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. राज्यातील मंदिरांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मंदिर उघडावी की नाही हा केंद्र सरकार व राज्यसरकार यांनी ठरविले आहे. केंद्रसरकारची लोकं राज्यात आहे. त्यांनी विचार करावा. त्यांच्या नियमानुसार राज्यात मंदिरे उघडली जातील. मात्र केंद्राने आणि राज्याने कोरोनाबाबत जे नियम केलेले आहेत. त्याप्रमाणे सद्या चालू आहे.

: करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो

याबाबत राजू शेट्टी यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेट्टी म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा झालेला एक समझौता होता. तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचे आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झाले तरी मला आमदार करा, नाहीतर जीव सोडणार असे माझे म्हणणे नाही आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. याचबरोबर, गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. त्यामुळे काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही. करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी करेन असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0