मेट्रो मध्ये सायकल सोबत घेऊन सहज प्रवास – पुणे मेट्रो चे अजून एक दमदार पाऊल

Homeपुणे

मेट्रो मध्ये सायकल सोबत घेऊन सहज प्रवास – पुणे मेट्रो चे अजून एक दमदार पाऊल

Ganesh Kumar Mule Aug 26, 2021 11:00 AM

Contract workers | कंत्राटी कामगारांच्या वेतनाची रक्कम थकवणाऱ्या ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा 
Swachh Survey Feedback : मनपा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व  मित्रांना सोबत घेऊन सकारात्मक प्रतिक्रिया घ्याव्या लागणार!
Adhar No | Voter list | मतदार यादीतील नोंदीचे आधार क्रमांकाच्या आधारे प्रमाणीकरण

 मेट्रो ट्रेनमध्ये सायकल सोबत सहज प्रवास

– पुणे मेट्रो चे अजून एक दमदार पाऊल

पुणे. 

पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरु असून येत्या काही महिन्यात मेट्रोचीप्रत्यक्ष सेवा सुरु होणार आहे. महामेट्रोने अजून एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णयघेतला आहे. यामुळे  प्रवाश्याना सायकल सहित मेट्रोमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. २६ ऑगस्ट ला महामेट्रोचेव्यवस्थापकीय संचलक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि मेट्रोचे अधिकारी  यांनी फुगेवाडी स्थानक ते संत तुकाराम नगर स्थानक आणिसंत तुकाराम नगर स्थानक ते फुगेवाडी स्थानक असा प्रवास केला. याप्रवासादरम्यान मेट्रोचे अधिकारी सायकल लिफ्टद्वारे फुगेवाडी मेट्रोस्थानकाच्या फलाटावर घेऊन गेले, तेथून मेट्रो ट्रेनमध्ये सायकलसहितप्रवेश केला. मेट्रो चे हे अजून एक पाऊल पडले असे मानले जात आहे.

 सायकल आणि मेट्रोचावापर करून विद्यार्थी वर्ग, कामगार वर्ग, कर्मचारी वर्ग, महिला वर्ग, सेल्समन, वस्तूचे घरोघरी वितरण करणारे कर्मचारी, असे सर्व सहजतेने मेट्रोचा वापर करू शकतात.

मेट्रो ही एक अत्यंत सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि जलद प्रवास माध्यमआहे. मेट्रोमध्ये महिला आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र’नारीशक्ती’ डबा ठेवण्यात येणार आहे. मेट्रो स्टेशन मध्ये  आणि मेट्रोकोचमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा असणार आहे. त्यामुळे  मेट्रोची सर्व स्थानकेआणि डबे कायम निगराणीखाली असल्याने कोणत्याही अनुचित प्रकारासआळा बसण्यास मदत होणार आहे. असे मेट्रो च्या वतीने सांगण्यात आले.

सायकलींचा वापर करून मेट्रो प्रवास करणे शक्य असल्यामुळे फस्ट व  लास्ट मिले काँनेक्टिव्हिटी साधली जाणार आहे. सोबतच दोनवेगवेगळ्या प्रवास सुविधांचे एकत्रीकरण होणार आहे.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचलक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, “सायकल हे एक पर्यावरण पूरक प्रवास माध्यम असूनमेट्रो ट्रेनमध्ये सायकल घेऊन जाण्यास परवानगी देण्यात येणारअसल्यामुळे असंख्य पुणेकरांना अत्यंत मोलाची मदत होणार आहे. मेट्रोकोचमध्ये सायकल स्वरांसाठी योग्य ते सूचना फलक आणि मार्गदर्शकफलक उपलब्ध करून देण्यात येतील. मला आशा आहे की पुणेकर यासेवेचा पूर्ण क्षमतेने वापर करतील.”

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0