प्रशांत जगताप जमिनींना चटावले आहेत!   : सभागृह नेता गणेश बीडकरांनी राष्ट्रवादी शहर अध्यक्षांच्या विधानाचा घेतला समाचार   : टेंडर मधेच जगतापांना रस

HomeपुणेPMC

प्रशांत जगताप जमिनींना चटावले आहेत! : सभागृह नेता गणेश बीडकरांनी राष्ट्रवादी शहर अध्यक्षांच्या विधानाचा घेतला समाचार : टेंडर मधेच जगतापांना रस

Ganesh Kumar Mule Sep 10, 2021 3:40 PM

PMRDA | PMC Pune | PMRDA कडून समाविष्ट ३४ गावातील रस्ते व सुविधा भूखंडाचे पुणे  महानगरपालिकेकडे हस्तांतरण
PMC Pune Employees Promotion | अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी पदोन्नती | सरकारने मान्यता देऊन महिना होत आला तरी अजून पदोन्नती नाही
Plastic seize | दोन दिवसात ९५० किलो प्लास्टिक जप्त | ५५ हजाराचा दंड केला वसूल

प्रशांत जगताप जमिनींना चटावले आहेत!

: सभागृह नेता गणेश बीडकरांनी राष्ट्रवादी शहर अध्यक्षांच्या विधानाचा घेतला समाचार

: टेंडर मधेच जगतापांना रस

पुणे: शहरातील जमिनींची खडान् खडा माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘टेंडर जगताप ‘ यांना आहे, असे त्यांच्या आजच्या विधानावरून दिसते. जमिनींना ते चटावले आहेत. ही त्यांच्या पक्षाची परंपरा आहे. तीच परंपरा जगताप जोमाने चालवत आहेत, अशा शब्दात महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा समाचार घेतला.

: जगतापांच्या कारभाराला त्यांच्या पक्षाचे सभासद कंटाळले

बिडकर म्हणाले, महानगपालिकेच्या ताब्यात असलेल्या ॲमिनिटी स्पेसच्या सर्व जमिनी या २०१७ च्या आधीच्या आहेत. त्यावेळी टेंडर जगताप महापौर होते. या जमिनींची माहिती त्यांनी नीट घेतली असणारच. त्यांनी हे देखील लक्षात घ्यावे की, त्यांच्यापासून या सर्व जमिनी भारतीय जनता पक्षाने सुरक्षित ठेवल्या आहेत.  पुण्याच्या विकासासाठीच या जमिनी वापरल्या जाणार आहेत, त्यामुळेच चुकीचे आरोप करत जगताप दिशाभूल करत आहेत.  बिडकर पुढे म्हणाले कि, पक्षाने त्यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. मात्र जगताप यांना शहराच्या आणि संघटन वाढीच्या कामात रस नसून महानगरपालिका आणि टेंडर यामध्येच त्यांचा रस आहे. पालिकेच्या कामात त्यांचा वाढत असलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी तसेच नगरसेवक त्रस्त झालेले आहेत. पुणेकरांच्या हितासाठीचे निर्णय घेण्यासाठी विविध समित्यांच्या बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद एकमताने पाठिंबा देतात. मात्र टेंडर जगताप याला विरोध करत विकासकामांमध्ये खोडा घालतात. शहर सुधारणा समिती असो अथवा स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीच्या सभासदांनी एकमताने मान्य केलेल्या अनेक विषयांच्या विरोधात जगताप यांनी भूमिका घेतल्याने त्यांच्या या कारभाराला राष्ट्रवादीचे अनेक सभासद कंटाळले असल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी स्पष्ट केले.
दिसली मोकळी जमीन की बळकाव, ही प्रवृत्ती पुणेकरांनी खड्यासारखी वेचून बाजूला फेकली. ही प्रवृत्ती पुन्हा जमीनींवर डोळा ठेवून आहे.

      गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0