पर्यावरण सल्लागार राकेश धोत्रे यांचा यशस्वी उद्योजक म्हणून सन्मान
: “यशोस्तुते” या कार्यक्रमात केला गौरव :
सिने अभिनेत्री मानसी नाईक यांनी घेतली मुलाखत
नाशिक: रिसील प्रस्तुत, “यशोस्तुते” या कार्यक्रमात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राकेश धोत्रे यांचा यशस्वी उद्योजक म्हणून सन्मान चिन्ह” देऊन नाशिक येथे गौरव करण्यात आला. यावेळी सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांनी धोत्रे यांचा जीवन प्रवास उलगडणारी एक मुलाखत घेतली आणि भविष्य काळातील धोत्रे यांच्या योजनांसाठी शुभेच्छा दिल्या.
– पर्यावरण क्षेत्रात काम केल्याबद्दल सन्मान
संपूर्ण महाराष्ट्रामधून एकूण ५० यशस्वी उद्योजकांचा गौरव या कार्यक्रमात MTDC Resort नाशिक येथे करण्यात येणार आहे. सोमवारी या कार्यक्रमाचा शुभारंभ सिने अभिनेत्री मानसी नाईक यांच्या हस्ते करण्यात आला, आणि त्याच या कार्यक्रमाच्या यजमान देखील आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील असे उद्योजक ज्यांनी पूर्वी हलाखीची परिस्थिती असताना देखील त्यावर अथक प्रयत्नाने मात करून या परिस्थितीवर विजय मिळविला आणि आज व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी जपून समाजात काम करीत आहेत स्वतःचे आणि आपल्या बरोबरीच्या लोकांचे देखील कुटुंब यशस्वीपणे सांभाळत आहेत.
राकेश धोत्रे याचे लहानपणीचे जीवन व एकूणच जीवन प्रवास पर्यावरण विषयातील अभ्यास, कायदे या विषयातील विविध प्रकारची कामे करण्यात गेला आहे. विशेषतः कोरोना काळात धोत्रे यांनी केलेली समाजसेवा याची संपूर्ण माहिती धोत्रे यांनी मुलाखती दरम्यान विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अगदी विस्तृतपणे दिली. धोत्रे यांच्या गौरवाने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अधिक बळ मिळाले आहे.
COMMENTS