मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचा लाभ   : शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांची माहिती   : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

HomeपुणेPMC

मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचा लाभ : शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांची माहिती : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

Ganesh Kumar Mule Sep 08, 2021 4:12 PM

River Revival Project | जुन्या व दुर्मिळ वृक्षांबाबत पुणे महापालिकेला करावा लागला खुलासा | नेमके काय आहे प्रकरण?
Dr.  Rajendra Bhosle, IAS take over the charge of Pune Municipal Commissioner!
Pune Water Cut on Thursday | गुरुवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा बंद राहणार 

मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचा लाभ

: शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांची माहिती

: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

पुणे: महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. आयोगाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रस्तावावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच याचा लाभ मिळेल अशी माहिती शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांनी दिली.

: पृथ्वीराज सुतार यांनी वारंवार घातले लक्ष

महापालिका मुख्य सभेने 10 मार्च ला वेतन आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र त्यांनंतरही बरेच दिवस हा प्रस्ताव राज्य सरकार कडे पाठवला गेला नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रस्ताव महापालिकेतच अडकून पडला होता. त्यावर कर्मचारी संगठनांनी आंदोलनाचे हत्यार हातात घेतले होते. त्यानुसार जून महिन्यात सरकारकडे प्रस्ताव गेला. मात्र तिथे ही प्रस्तावाने वेग घेतला नाही. यामध्ये मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले. त्यानुसार प्रस्ताव तयार करून तो नगरविकास मंत्र्यापुढे ठेवण्यात आला आहे. मात्र गेल्या महिना भरापासून यावर काही निर्णय होत नाही. त्यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत.  दरम्यान याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संघटनांनी शिवसेनेचे महापालिका गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या सहकार्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. आणि आयोग लागु करण्यासंदर्भात मागणी केली. उपसभापती नी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर सुतार यांनी नुकतीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आयोगाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रस्तावावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच याचा लाभ मिळेल अशी माहिती शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांनी दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
0 Comments