अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ !
: पुणे शहराला मिळाला बहुमान
: महापौरांचे सर्वत्र अभिनंदन
पुणे: अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र नुकतेच महापौर मोहोळ यांना परिषदेकडून प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल महापौर मोहोळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
: जबाबदारीची जाणीव आणखी घट्ट: महापौर
अखिल भारतीय महापौर परिषद ही राष्ट्रीय स्तराववरील महापौरांची परिषद असून परिषदेचे अध्यक्ष आणि आग्र्याचे महापौर नवीन जैन यांनी महापौर मोहोळ यांची निवड उपाध्यक्षपदी केली आहे. महापौर मोहोळ यांच्या निमित्ताने पुणे शहराला हा बहुमान मिळाला आहे. या निवडीबद्दल महापौर मोहोळ म्हणाले, ‘आपल्या कामाची आणि पदाला न्याय देण्याची दखल घेतली जाते. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान देणारे आहे. हे राष्ट्रीय पातळीवर पद म्हणजे केवळ माझाच नाही तर तमाम पुणेकरांचा सन्मान आहे. यामुळे काम करण्याचा उत्साह तरआणखी वाढेलच शिवाय जबाबदारीची जाणीवही आणखी घट्ट होत आहे.’
महापौरपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने माझ्याकडे दिल्यानंतर पदाला न्याय देण्याचा, झोकून आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळातही अशीच वाटचाल सुरु राहील. पुणे शहराला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासोबतच शहराच्या शाश्वत विकासावर याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. हे शिवधनुष्य आगामी काळातही पेलू. संपूर्ण कारकिर्दीत पुणेकरांची लाभलेली साथ आणि आमच्यावर दाखवलेला विश्वास हाही या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे’.
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे.
—
COMMENTS