ZP School Khed | विद्यार्थ्यांनी शाळेसाठी अँड्रॉइड- एल.ई.डी. टी.व्ही दिला भेट!

Homeadministrative

ZP School Khed | विद्यार्थ्यांनी शाळेसाठी अँड्रॉइड- एल.ई.डी. टी.व्ही दिला भेट!

Ganesh Kumar Mule May 05, 2025 12:09 PM

Dr Vasant Gawde | युवा पिढीसाठी मूल्य शिक्षण गरजेचे | प्रा. डॉ. वसंत गावडे 
Annasaheb Waghire College | ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या राज्यस्तरीय वारीमध्ये सहभाग
PMC Education Department | MLA Madhuri Misal |पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार आक्रमक

ZP School Khed | विद्यार्थ्यांनी शाळेसाठी अँड्रॉइड- एल.ई.डी. टी.व्ही दिला भेट!

 

Pune News – (The Karbhari News Service) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कडाचीवाडी ता. खेड,जि- पुणे येथील सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता सातवीच्या तुकडी अ आणि ब या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेसाठी अँड्रॉइड- एल.ई.डी. टी.व्ही भेट दिला. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक संजय राळे व वर्गशिक्षिका  वैशाली शिंदे (गावडे) यांनी दिली. (Education News)

शाळेमध्ये नुकताच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व शुभेच्छा समारंभ पार पडला. त्याप्रसंगी सातवीचे विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी सदर कार्यक्रमात शाळेविषयीची कृतज्ञता म्हणून पुढील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी अशी भेटवस्तू म्हणून अँड्रॉइड एलईडी टीव्ही भेट देण्याचे ठरविले. जेणेकरून माहिती- तंत्रज्ञानाच्या युगात सदर वस्तूचा उपयोग विद्यार्थ्यांच्या ज्ञान- कौशल्य वाढीसाठी होईल. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय घाडगे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्या मा.लताताई कड,  प्रदीप कड,  संदीप वानखेडे, उपाध्यक्ष व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,गावचे ग्रामस्थ या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या सर्व शिक्षक वृंदानी तसेच रासे केंद्राचे केंद्रप्रमुख  संदीप जाधव सर, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र टिळेकर सर, खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले  यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: