Prithviraj Sutar | क्ष-किरण तपासण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरीत मोफत सुरू कराव्यात  | अन्यथा आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा 

HomeपुणेBreaking News

Prithviraj Sutar | क्ष-किरण तपासण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरीत मोफत सुरू कराव्यात | अन्यथा आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा 

Ganesh Kumar Mule Jul 07, 2022 1:32 PM

Dr. Ashish Bharti | महापालिका आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची अखेर बदली | राज्य सरकारकडून आदेश जारी
Admission Process of PMC medical college : महापालिका मेडिकल कॉलेज : ७० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण! : प्रवेश प्रक्रियेचा आज अंतिम दिवस
Medical College Of PMC : महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा अंतिम टप्पा देखील पार! : लवकरच प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया 

क्ष-किरण तपासण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरीत मोफत सुरू कराव्यात

| अन्यथा आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा

पुणे | पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या क्ष-किरण तपासण्या मोफत आरोग्य तपासणी योजनेअंतर्गत करण्यात येत होत्या. मात्र आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशाने या तपासण्या मोफत करणे बंद करण्यात आले आहे. यामुळे जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे क्ष-किरण तपासण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरीत मोफत सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांच्याकडे केली आहे. तसे नाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील सुतार यांनी दिला आहे.

सुतार यांच्या पत्रानुसार पुणे मनपाच्या मार्फत क्रस्ना डायग्नोस्टीक्स कडून कमला नेहरू रूग्णालय व कै. जयाबाई सुतार दवाखाना कोथरूड येथे पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या क्ष-किरण तपासण्या मोफत आरोग्य तपासणी
योजनेअंतर्गत करण्यात येत होत्या, त्याचा फार मोठा फायदा पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाना होत होता. परंतु आरोग्य विभागा मार्फत  २० जून २०२२ रोजी लेखी पत्राद्वारे क्रस्ना डायग्नोस्टीक्स सेटरला कळविण्यात आले की आपण फक्त पॅथालॉजीच्या तपासण्या उदा. हिमोग्राम, युरीन, रक्त, इ या मोफत कराव्यात व क्ष-किरण तपासण्या मोफत करू नयेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण व गैरसोय झाली असून, याबाबत ज्येष्ठ नागरिक मोठया प्रमाणावर तक्रार करीत आहेत. हा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकावरती अन्याय करणारा निर्णय आहे. आम्ही या पत्राद्वारे आपल्याकडे पूर्वीप्रमाणेच क्ष-किरण तपासण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरीत मोफत सुरू कराव्यात अशी मागणी करीत असून, आपण त्वरीत मोफत तपासण्या सुरू केल्या नाहीत तर आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकाच्या सहकार्याने तीव्र आंदोलन आपल्या दालनात करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील, असे ही सुतार यांनी म्हटले आहे.