Development Of Students | विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार  | सहाय्यक जिल्हाधिकारी  तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांचे प्रतिपादन

HomeBreaking Newssocial

Development Of Students | विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार | सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांचे प्रतिपादन

Ganesh Kumar Mule Apr 21, 2023 3:35 AM

Pune Book Festival | ‘शांतता….पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांचा उपक्रमात सहभाग
Shivajinagar Bus Station Pune | अडीच वर्षात शिवाजीनगर येथील बसस्थानाकाचे काम पूर्ण होणार!
Pune Mahanagarpalika Kamgar Union | पुणे महापालिका कामगार संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार

| सहाय्यक जिल्हाधिकारी  तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांचे प्रतिपादन

| दळवट येथे प्रकल्पस्तरीय विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

नाशिक | विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून प्रकल्पस्तरावर एकत्रीत वार्षिक नियोजन व घटक नियोजन करून सर्व आश्रमशाळांमध्ये सुनियोजीतपणे अध्यापनाचे कामकाज केले जाईल.  दर महिन्याला विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल, त्यानुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येईल. असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी  तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण ता. कळवण, जि. नाशिक अंतर्गत 40 शासकीय व 39 अनुदानित आश्रमशाळांतील शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांतर्गत प्रकल्पस्तरीय चित्रकला, भाषण, सामान्य ज्ञान व हस्ताक्षर स्पर्धेत यश मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, दळवट, ता. कळवण, जि. नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री. विशाल नरवाडे (IAS) यांच्या शुभहस्ते चित्रकला, भाषण, सामान्य ज्ञान व हस्ताक्षर स्पर्धा अंतर्गत प्रकल्पस्तरावर विजयी झालेल्या विविध गटातील एकूण 74 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी  विशाल नरवाडे (IAS) यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. प्रकल्पस्तरावर एकत्रीत वार्षिक नियोजन व घटक नियोजन करून सर्व आश्रमशाळांमध्ये सुनियोजीतपणे अध्यापनाचे कामकाज केले जाईल, दर महिन्याला विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल, त्यानुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येईल. तसेच पुढील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून शैक्षणिक कामकाजाचे नियोजन केले असून विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत व्यक्त केले.
गुणगौरव सोहळ्यास पालकांची उपस्थिती उल्लेखनिय होती. गुणगौरव व पारितोषिक मिळाल्यामुळे विद्यार्थी खूप आनंदी होते.  शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या 5 शिक्षकांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शैक्षणिक गुणवत्ता कक्ष(ERC) अंतर्गत राबविण्यात आलेल्या भूगोल दिन, मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रिय विज्ञान दिन उत्कृष्ट रितीने साजरा करणाऱ्या प्रकल्पातील 15 शाळांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमानंतर प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत वार्षिक निकाल, वसतीगृह सोयीसुविधा , आरोग्य तपासणी, विद्यार्थी पटसंख्या, भविष्यवेधी शिक्षण, मिशन नवोदय, JEE, NEET, CET अभ्यासक्रम, बायोमेट्रिक कर्मचारी हजेरी, शैक्षणिक साहित्य निर्मीती, घटक नियोजन, उन्हाळी सुटीतील नियोजन, Tribal Sport School, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती (इ. 5 व 8 वी), विद्यार्थी आधार नोंदणी, परसबाग, शाळा प्रवेशोत्सव आणि वृक्षारोपण या मुद्द्यांवर महत्वपुर्ण बैठक घेऊन पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमानिमित्त दळवट गावच्या सरपंच  राधाबाई पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सर्व  बी. एम. पाटील,    आर. आर. पाटील,   दिपक कालेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष    यशवंत पवार, गावचे पोलिस पाटील   धनराज पवार, सर्व शिक्षणविस्तार अधिकारी, विषय मित्र, सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी  दिपक कालेकर यांनी केले.   रमेश बोरसे व    अजित कांबळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य  योगेश जोशी, अधिक्षक अजित आपसिंगेकर , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी नियोजन केले.