400 कोटींच्या प्रस्तावांना आज स्थायी समितीत मिळणार का मंजूरी?
: निवडणुकीनंतर विषय होण्याची शक्यता
पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागलेले असताना तब्बल ४०० कोटी रुपयांचे दोन प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आज मंजूर होणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे. संगमवाडी ते बंडगार्डन हा नदी सुधार प्रकल्पाच्या २६५ कोटीच्या पहिल्या टप्प्याला आणि खराडी येथील पीपीपी तत्त्वावर विकसित केले जाणारे आठ रस्ते व नदीवरील पूल अशा १४० कोटीच्या प्रस्तावाचा समावेश आहे. राजकीय दबावामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हा विषय निवडणुकीनंतर करावा, अशा मताचे आहेत. त्यामुळे आजच्या स्थायी समितीच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात पीपीपी तत्त्वावर रस्ते विकसित करण्याची तरतूद केल्यापासून हा विषय वादग्रस्त ठरला आहे. प्रशासनाने खराडी भागातील आठ रस्ते व नदीवरील पूल पीपीपी तत्त्वावर करण्यासाठी निविदा काढली होती. हा प्रस्ताव देखील मंजुरीसाठी येणार आहे. १४० कोटीचा हा प्रकल्प असून, यातून खराडी भागातील सुमारे ९ किलोमीटरचे रस्ते आणि एक पूल बांधला जाणार आहे. महापालिकेकडे प्रकल्पांसाठी निधी नसल्याने पीपीपीसाठी क्रेडीट नोटचा पर्याय स्वीकारला असल्याचे यापूर्वी आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS