पुण्यातील तीनपट कराबाबत लोकहिताचा निर्णय घेणार | उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन
| आमदार सुनील टिंगरे यांनी उपस्थित केला होता मुद्दा
पुणे शहरातील अनधिकृत बांधकाम असणाऱ्या मिळकतीला आकारण्यात येणारी तीन पट रक्कम रद्द करावी अशी मागणी, राष्ट्रवादीचे वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली. त्यांनी केलेल्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत माहिती घेऊन लोक हिताचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. (Illegal construction three times tax)
पुणे शहर आणि समाविष्ट गावात नागरिकांकडून अनधिकृत बांधकामे केली जातात. सरकारच्या नियमानुसार अशा मिळकती कडून तीन पट कर घेतला जातो. मात्र याबाबत नागरिकाकडून तक्रारी आल्या आहेत. दरम्यान राज्य सरकार ने पिंपरी चिंचवड मधील हा कर रद्द केला आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही तीन पट कर रद्द केला जावा. अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली. त्यासाठी गुंठेवारीचा नियम बदलण्याची मागणी देखील टिंगरे यांनी केली. तसेच ४०% सवलत कायम ठेवण्याची मागणी देखील टिंगरे यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याबाबत महापालिकेकडून निश्चित माहित घेऊ आणि लोकहिताचा निर्णय घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. यामुळे पुणे आणि समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (MLA Sunil Tingre)