MNS Pune | Raj Thackeray | मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांना एकत्र आणणार का राज ठाकरे?  | उद्यापासून राज ठाकरे पुणे दौऱ्यावर 

HomeBreaking Newsपुणे

MNS Pune | Raj Thackeray | मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांना एकत्र आणणार का राज ठाकरे?  | उद्यापासून राज ठाकरे पुणे दौऱ्यावर 

Ganesh Kumar Mule May 16, 2022 12:45 PM

Vasant More : MNS : पुणे मनसेत कोण आहेत पार्ट टाइम जॉबवाले?  : वसंत मोरे आज राज ठाकरेंना याबाबत बोलणार  
Vasant More Katraj Pune | वसंत मोरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र..!
MNS : Sainath Babar : पुण्यात उद्या हनुमान चालीसा लावणारच  : मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचा इशारा 

मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांना एकत्र आणणार का राज ठाकरे? 

: उद्यापासून राज ठाकरे पुणे दौऱ्यावर 

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा उद्यापासून पुण्याच्या (Pune) दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय रविवारी मनसेच्या (MNS) पार पडलेल्या मेळाव्या संदर्भातदेखील राज ठाकरे या दौऱ्यामध्ये आढावा घेणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुढील महिन्यातील पाच तारखेला राज ठाकरे अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी पुण्यातील या दौऱ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले जात आहे. तर, दुसरीकडे आगामी काही दिवसात पुण्यामध्ये राज यांची आणखी एक जाहीर सभा होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Raj Thackeray Pune Tour)

दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी रज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर उत्तरसभेत आणि औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेतदेखील त्यांनी मनसे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे जाहीर केले होते. जदरम्यान, राज यांच्या या भूमिकेनंतर पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुणे शहरातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यात मागील काही दिवसांपासून बेबनाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यामध्ये पुणे मनसेमधील खदखद दूर करण्याचा प्रयत्न करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यात होणार ‘राज’ सभा?दोन दिवसीय पुणे दौऱ्यामध्ये राज ठाकरे पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे यांची पुण्यामध्ये जाहीर सभा घेण्याची चर्चा देखील पुणे मनसेमध्ये जोरदार सुरू आहे. नुकतीच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ सभा पार पडल्या यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि फडणवीसांपाठोपाठ आता राज ठाकरेदेखील पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या सभेबाबत चर्चा होऊ शकते अशी शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान, औरंगाबाद येथील सभेनंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर आली असून, यासभेसाठी मनसेकडून पोलिसांना पत्र देत परवानगी मागण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0