बारामती सह पुणे, मुंबई या शहरांनाही अंधारात ठेवणार का?
: शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेची विचारणा
पुणे : शेतकऱ्यांचे विद्युत कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन बंद करण्या अगोदर कोणतीही पुर्व लेखी नोटीस न देता महावितरण व परेशान कंपनीने पुणे विभागातील अधिका-यांनी हजारो कृषिपंपांची विज कनेक्शन ट्रांसफार्मर पासूनच बंद केलेने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्या विरोधात शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी शुक्रवार दिनांक 19 रोजी महावितरणचे पुणे विभागीय अधिकारी नाळे, अधिक्षक अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे व डेपोटी इंजि. सुळ व गोफने यांच्याशी समक्ष चर्चा करून बंद केलेले ट्रांसफार्मर पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भात निवेदन देऊन विनंती केली.
सुमारे एक तासाहून अधिक काळ चाललेल्या बैठकीमध्ये पुणे विभागाचे व बारामती विभागाचे तीनही अधिकाऱ्याची भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कृषी पंपाची सोडवलेले ट्रान्सफार्मर कनेक्शन परत जोडण्याच्या संदर्भ चर्चा केली. यावेळी विठ्ठल पवार राजे यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये देखील महावितरण व पारेशन कंपनी चे अधिकार्यांचे विरोधात १५६(३) खाली अर्ज देऊन तक्रार दाखल करण्याचा इशारा दिलेला आहे. यावेळी इंदापूर तालुका पुर्व भागातील शेतकरी उपस्थित होते. बेकायदेशीरपणे विद्युत पुरवठा बंद करणेबाबत १५ दिवसांची लेखी नोटीस न देता तसेच कोणतीही पूर्व सूचना व पंधरा दिवसाचे आगाऊ नोटीस न देता कृषी पंपाचे कनेक्शन ट्रांसफार्मर पासूनच बंद केलेने शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना संतप्त झालेली आहे. यावेळी चर्चा करताना त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना २४ तासांचा स्पष्ट इशारा दिलेला आहे की कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन ट्रांसफार्मर पासून बंद केलेले आहे ते पूर्ववत न केल्यास बारामती शहरासह पुणे ठाणे मुंबई या शहराचा उद्या पुरवठा देखील खंडित केला जाईल. होणाऱ्या परिणांमास महापरेशन व वितरण अधिकारी जबाबदार राहतील. असा इशारा शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी दिलेला आहे यावेळी अनेक शेतकरी बैठकीला उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व महापारेषण कंपनीने शेतकऱ्यांची कृषी बिले अत्यंत चुकीच्या पद्धतीने ४पटीने अधिकची दिलेली आहेत. 3 एचपी पासून तर 15 एचपी पर्यंतच्या कृषिपंपांना ३/४ पटीने अधिकची आंदाजै विजबिले पाठवुन कृषी शेतकऱ्यांची फार मोठी अर्थीक फसवणूक केली आहे. त्या विरोधामध्ये शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यापुर्वीच्या दोन्ही याचिकांचे निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे असे देखील यावेळी विठ्ठल पवार यांनी सांगितले तरी देखील परेशान चे कंपनी विरोधात कंटेम्ट ऑफ कोर्ट दाखल केली जाईल. महावितरण पारेषण च्या चुकीच्या कृषी विजबील वसुलीला ब्रेक लावला जाईल. त्यानंतर मात्र अधिकारी व शेतकऱ्यांना मध्ये होणारे क्लॅयासेसला महावितरण पारेषणचे अधिकाऱ्यांनी तयार राहावे असे आवाहन देखील शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS
Very thanks kar Bari portal and Mr Ganesh Modi ji
The right news