Wildlife Week | पृथ्वीवर जगण्याचा अधिकार माणसां एवढाच प्राणीमात्रांनाही | वैभव काकडे

HomeBreaking Newsपुणे

Wildlife Week | पृथ्वीवर जगण्याचा अधिकार माणसां एवढाच प्राणीमात्रांनाही | वैभव काकडे

Ganesh Kumar Mule Oct 07, 2023 1:08 PM

Marathi Language | आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे – डॉ. पुरुषोत्तम काळे
Waghire College | वाघिरे महाविद्यालयाच्या पदार्थ विज्ञान विभागातील माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा संपन्न 
Annasaheb Waghire College | ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या राज्यस्तरीय वारीमध्ये सहभाग

Wildlife Week | पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (PDEA) अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर (Annasaheb Waghire College Otur) मध्ये वन्यजीव सप्ताहाचे (Wildlife Week) औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS Department), वनस्पतीशास्त्र (Botany Department)  व प्राणीशास्त्र विभाग (Zoology Department) तसेच वन विभाग जुन्नर (Forest Department Junnar) यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह निमित्त विशेष व्याख्यान तसेच वन्यजीवांवर आधारित पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे (Dr Abhay Khandagale) यांनी दिली.

आपल्या मनोगतामध्ये  वैभव काकडे यांनी असे मत व्यक्त केले की, पृथ्वीवर माणसाचे अस्तित्व सर्व प्राणिमात्रामुळे अबाधित आहे कारण पर्यावरणाचे संतुलित ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य वन्यजीव अप्रत्यक्षपणे करीत असतात. वन्यजीव आहेत म्हणूनच अन्नसाखळी अबाधित आहे व अन्नसाखळी अबाधित असल्यामुळेच पर्यावरण संतुलन होत असते. पर्यावरण व वन्यजीव संरक्षणासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे लोकांनी त्यासाठी जागरूक राहून वन्यजीवांना अभय दिले पाहिजे असेही मत ओतूर वनपरक्षेत्रित अधिकारी श्री वैभव काकडे यांनी व्यक्त केले.

याचबरोबर माणिक डोह बिबट निवारा केंद्राचे व्यवस्थापक श्री महेंद्र ढोरे यांनी आपल्या मनोगत मध्ये मानव बिबट संघर्ष व सहजीवन या विषयावरती मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी बिबट जीवनचक्र, त्याच्या सवयी, भक्ष, प्रज्योत्पादन इत्यादी गोष्टी विशद केल्या याबरोबरच बिबट समस्यांची मूळ कारणे काय आहेत व मानव बिबट सहजीवनासाठी आपण आपले वर्तन कसे ठेवावे याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याचबरोबर त्यांनी असेही आवाहन केले की आपल्या परिसरामध्ये बिबट पिल्ले आढळल्यास त्यांना न हाताळता तात्काळ वन विभागास संपर्क करावा जेणेकरून त्यांचे संरक्षण केल्या जाऊ शकते.

सदर कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे यांनी यांनीही मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी श्री वैभव काकडे, वनपरिक्षेत्रीत अधिकारी ओतूर, श्री महेंद्र ढोरे व्यवस्थापक बिबट निवारा केंद्र माणिक डोह, वनरक्षक श्री गीते श्री राठोड श्री बेल्हे आदी मान्यवर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ व्ही एम शिंदे, डॉ बी एम शिंदे, डॉ व्ही डी जाधव, प्रा सागर पारधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजयकुमार राहंगडाले यांनी प्रास्ताविक केले तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी अमोल बिबे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन निलेश काळे यांनी व्यक्त केले