मिळकतकर विभागावर कोण मारणार बाजी?
: उपायुक्तांमध्ये रस्सीखेच
पुणे : महापालिकेचे कर संकलन आणि आकारणी विभाग प्रमुख विलास कानडे यांची अतिरिक्त आयुक्त पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे आता मिळकतकर विभाग प्रमुख पद रिक्त राहणार आहे. दरम्यान या विभागात काम करण्यासाठी बरेच उपायुक्त उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांच्यात रस्सीखेच चालली आहे. त्यामुळे यावर कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका अधिकाऱ्यांसाठी अतिरिक्त आयुक्त पद निर्माण करण्यात आले आहे. नुकतेच अतिरिक्त आयुक्त पदावरून ज्ञानेश्वर मोळक निवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या पदावर नियमानुसार विलास कानडे यांची वर्णी लागणे अपेक्षित होते. त्यानुसार राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाले आहेत. दरम्यान कानडे हे मिळकतकर विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. हे पद आता रिक्त होणार आहे. त्यामुळे या खात्यात काम करण्यासाठी महापालिकेचे बरेच अधिकारी इच्छुक आहेत.
मिळकतकर विभाग हा महापालिकेचा विशेष महत्वाचा विभाग आहे. कारण हा विभाग महापालिकेला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देतो. त्यामुळे या विभागाकडे सर्वांचे लक्ष असते. शिवाय नागरिकांशी जुडला गेलेला हा विभाग आहे. त्यामुळे या विभागात काम करण्यासाठी बरेच उपायुक्त इच्छुक आहेत. यामध्ये माधव जगताप, संदीप कदम, अजित देशमुख, यशवंत माने यांची नावे आघाडीवर आहेत. यापैकी कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
COMMENTS