What is the cost of one session of dialysis In PMC Pune Hospitals? | पुणे महापालिकेने सुरु केलेल्या अल्प दरातील डायलिसिस सेवेचा आतापर्यंत 71 हजार हून अधिक लोकांनी घेतला लाभ! 

HomeBreaking Newsपुणे

What is the cost of one session of dialysis In PMC Pune Hospitals? | पुणे महापालिकेने सुरु केलेल्या अल्प दरातील डायलिसिस सेवेचा आतापर्यंत 71 हजार हून अधिक लोकांनी घेतला लाभ! 

गणेश मुळे Jan 24, 2024 1:36 PM

Kamla Nehru Hospital Dialysis Center | मध्यवर्ती  भागातील डायलिसिस ची गरज असणाऱ्या रूग्णांना दिलासा | कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 15 बेडचे डायलिसिस युनिट लवकरच सुरु होणार!
15 bed dialysis unit to start soon in PMC Kamala Nehru Hospital 
More than 71 thousand people have benefited from the low rate dialysis service started by Pune Municipal Corporation!

What is the cost of one session of dialysis In PMC Pune Hospitals? | पुणे महापालिकेने सुरु केलेल्या अल्प दरातील डायलिसिस सेवेचा आतापर्यंत 71 हजार हून अधिक लोकांनी घेतला लाभ!

What is the cost of one session of dialysis In PMC Pune Hospitals? | खाजगी हॉस्पिटलचा भार सहन न करणाऱ्या गोरगरिबांना परवडणारी सुविधा देण्याचा भाग म्हणून पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department Pune Municipal Corporation) आपल्या 8 दवाखान्यात पीपीपी तत्वावर अल्प दरात डायलिसिस ची सुविधा सुरु केली आहे. अवघ्या 400 रुपयांत ही सुविधा दिली जाते. गेली 7 वर्ष झाले, महापालिका ही सुविधा देत आहे. या सेवेचा आतापर्यंत 71 हजार हून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे.  अशी माहिती पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे (Dr Sanjeev Wavre Pune PMC) यांनी दिली. (What is the cost of one session of dialysis In PMC Pune Hospitals?)
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) वतीने 2017 साली पहिल्यांदा कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये (Kamla Nehru Hospital PMC) डायलिसिस सेंटर सुरु केले.   पीपीपी तत्वावर केलेल्या सेंटर मध्ये फक्त 400 रुपयांत ही सुविधा उपलब्ध करून दिली. याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मग महापालिकेने अजून 7 हॉस्पिटलमध्ये ही सुविधा सुरु केली. मात्र याची गरज अजून वाढतच आहे. कारण रुग्णाची संख्या देखील वाढत आहे. (what is the actual cost of dialysis?)

बदलती जीवनशैली हे आजाराचे कारण

रुग्णांची संख्या वाढण्याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली. वाढलेले शहरीकरण. लोकांच्या खाण्यात होत असलेला बदल आणि वाढता ताणतणाव यामुळे सर्रास लोक हे मधुमेह (Diabetes), रक्तदाब (Blood Pressure BP) आणि हायपरटेन्शन (Hypertension) या आजाराने ग्रस्त आहेत. हे आजार वर्षानुवर्षे तसेच राहिल्याने याचा थेट परिणाम किडनी (Kidney Damage) वर होतो. या आजारांमुळे लोकांचे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्णांना डायलिसिस चा उपचार घ्यावा लागतो.

– पुणे मनपाच्या 8 दवाखान्यात डायलिसिस सेंटर

याबाबत डॉ वावरे यांनी सांगितले कि, यातील काही रुग्णांना आठवड्यातून तीनदा डायलिसिस चा उपचार घ्यावा लागतो, काही लोकांना दोनदा, तर काही लोकांना महिन्यातून बऱ्याच वेळा हा उपचार घ्यावा लागतो. डायलिसिस चा उपचार करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये एका वेळी 2500 रु च्या आसपास खर्च (Dialysis Cost in Private Hospital) येतो. सरकारी दवाखान्यात डायलिसिस उपचार करण्याचा दर हा 1400 रु ते 1600 रु (Dialysis Cost in Government Hospital) इतका आहे. हे दर गरीब लोकांना परवडत नाहीत. त्यामुळे मग पुणे महापालिकेने अल्प दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले. त्यानुसार 2017 सालापासून अवघ्या 400 रुपयांत ही सुविधा सुरु करण्यात आली. विशेष शहरी गरीब योजनेचे (Pune Municipal Corporation Shahari Garib Yojana) कार्ड असणाऱ्या रुग्णांना फक्त 200 रुपयांत (PMC Health Card) ही सुविधा दिली जाते. पीपीपी तत्वावर हा प्रकल्प सुरु करण्यात आला. आज 8 मनपा दवाखान्यात ही सुविधा सुरु आहे. हे काम स्वयंसेवी संस्थांना देण्यात आले आहे. त्यांना फक्त महापालिका जागा देते. त्यांच्याकडून भाडे घेतले जात नाही. तर काही ठिकाणी महापालिका मशीन देते. मात्र काही ठिकाणी 100% मशीन या संस्थांच्याच आहेत. आतापर्यंत या महापालिकेच्या 8 सेंटर मध्ये 71063 लोकांनी याचा लाभ घेतला आहे. आगामी काळात सेंटर ची संख्या वाढवावी लागणार आहे. असेही डॉ वावरे यांनी सांगितले.
डायलिसिस सेंटर                रुग्णांची संख्या 
1. कमला नेहरू रुग्णालय       : 38917
2. स्व राजीव गांधी रुग्णालय. : 23834
येरवडा
3. कै चंदूमामा सोनवणे
हॉस्पिटल, भवानी पेठ             : 2906
4. कै शिवरकर दवाखाना
वानवडी                                : 2296
5. कै अरविंद गणपत
बारटक्के, वारजे                     : 1072
6. कै रखमाबाई थोरवे
दवाखाना, आंबेगाव                 : 251
7. कै मीनाताई ठाकरे
दवाखाना कोंढवा                   : 1701
8. कै द्रौपदाबाई खेडकर
दवाखाना, बोपोडी                 :  86
एकूण                                  : 71063
—-

– कमला नेहरू हॉस्पिटलमधील सेवा महिन्याभरापासून बंद

पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) कमला नेहरू रुग्णालयात सुरुवातीला डायलिसिस सेंटर (Kamala Nehru Hospital DialysisCentre) सुरु करण्यात आले होते. हे सेंटर लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला चालवण्यास देण्यात आले आहे. मात्र या संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या या डायलेसिस सेंटरमध्ये दैनंदिन कामकाजात अनियमितता आढळून आलेल्या होत्या. याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण होत होती, त्यामुळे महापालिका प्रशासनाने लायन्स क्लब वर सेंटर चालवण्यास असमर्थ असल्याचा ठपका ठेवला होता. तसेच संस्थेकडून खुलासा देखील मागवला होता. मात्र संस्थेने महापालिकेवरच आरोप केले होते. त्यामुळे महापालिकेने संस्थेकडून काम काढून घेतले आहे. त्यामुळे महिन्याभरा पासून हे केंद्र बंद आहे. महापालिकेने आता नवीन टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. अशी माहिती डॉ वावरे यांनी दिली.
पुणे महापालिकेने आपल्या 8 दवाखान्यात नागरिकांसाठी अल्प दरात डायलिसीस उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. नागरिकांनी खाजगी रुग्णालयांवर अवलंबून न राहता महापालिकेच्या अल्प दरातील सेवेचा लाभ घ्यावा.
डॉ संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका. 
———